WPL 2026 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघात नव्या कोचची एन्ट्री, दिग्गज खेळाडू करणार मार्गदर्शन
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पाचही फ्रेंचायझींनी संघ बांधला आहे. पण या स्पर्धेला काही दिवस शिल्लक करताना मुंबई इंडियन्सने फासे टाकले आहे. संघाला नवा फिरकी प्रशिक्षक मिळला आहे.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं चौथं पर्व सुरु 9 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी पाचही संघांनी कंबर कसली आहे. मुंबई इंडियन्सने मागच्या पर्वात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं.गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघानेही नव्या पर्वासाठी संघांची बांधणी केली आहे. इतकंच काय प्रशिक्षकांची टीमही बांधली आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने ऑस्ट्रेलियाची माजी लेग स्पिनरला आपल्या संघाच्या फिरकी गोलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे. मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाची माजी लेग स्पिनर क्रिस्टन बीम्सची फिरकी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. क्रिस्टन बीम्सने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्स तिची निवड भारतीय खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊन केली आहे.
बीम्सकडे प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. तिने वुमन्स बिग बॅश लीग आणि इंग्लंडच्या द हंड्रेड लीग स्पर्धेत प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 महिला संघाची प्रशिक्षण दिलं आहे. भारतीय खेळपट्ट्या फिरकीला मदत करणाऱ्या असतात. अशा स्थितीत फिरकी बाजू भक्कम असणं गरजेच आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने क्रिस्टन बीम्सवर डाव लावला आहे. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओत क्रिस्टन बीम्सने सांगितलं की, मी येथे पहिल्यांदा प्रशिक्षक म्हणून आली आहे. झूलन गोस्वामी सारखी महान खेळाडूंपैकी आहे आणि तिच्याविरुद्ध मी क्रिकेट खेळली आहे. येथे तिच्यासोबत काम करण्याची एक मोठी संधी मिळत आहेत. मुंबई इंडियन्स संघात सध्या अमेलिया केर, सायका इशाक आणि इतर काही फिरकी गोलंदाज आहेत. त्यांना बीम्सच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल.
Spin आणि win ची recipe घेऊन #AaliRe 💙
Paltan, let’s welcome our new spin bowling coach, Kristen Beams 🙌#MumbaiIndians #TATAWPL pic.twitter.com/5xUrJgkaC5
— Mumbai Indians (@mipaltan) December 29, 2025
क्रिस्टन बीम्स क्रिकेट कारकीर्द
क्रिस्टन बीम्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट 2014 या वर्षापासून कारकिर्दीला सुरुवात केली. जवळपास चार वर्षे ऑस्ट्रेलिया संघात तिने योगदान दिलं. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये तिने एक कसोटी, 30 वनडे आणि 18 टी20 सामने खेळले. तसेच बिग बॅश लीग स्पर्धेत 45 सामने खेळले आहे. या दरम्यानंतर 2017 वनडे विजयात मोलाचा हातभार लावला होता. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात ती तिसऱ्या स्थानावर होती. क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर तिने प्रशिक्षकाची भूमिका साकारण्यास सुरूवात केली. आता तिच्या प्रशिक्षकाचा अनुभव मुंबई इंडियन्सच्या कामी येणार यात काही शंका नाही.
