IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा

आयपीएल 2026 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजीला चांगली धार असल्याचं दिसून येत आहे. खासकरून फिरकीपटू कृणाल पांड्याच्या गोलंदाजीत व्हेरिएशन दिसून येत आहे. फिरकीपटू असून बाउंसर टाकत असल्याने चर्चा होत आहे.

IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा
IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 13, 2026 | 9:34 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतही फलंदाजांचा बोलबाला आहे. फलंदाज चौकार आणि षटकार मारून गोलंदाजांची धुलाई करत आहे. असं असताना काही गोलंदाज मात्र प्रभावी ठरत आहे. अष्टपैलू कृणाल पांड्याची गोलंदाजीचं कौतुक होत आहे. त्याने आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आताही आरसीबीकडून त्याची कामगिरी चांगली होत आहे. यंदाच्या पर्वात त्याने गोलंदाजीत विशेष बदल केला आहे. त्याने फिरकी चेंडू टाकताना बाउंसरही टाकण्यास सुरूवात केली आही. काही बोटावर मोजता येतील असेच फिरकी बाउंसर टाकत होते. कारण अंदाज चुकला तर थेट सीमेपार चेंडू पोहोचवण्याची ताकद प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाकडे असते. असं असताना कृणाल पांड्याने बाउंसर टाकण्यात प्रभुत्व मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्या बाउंसरचा सामना करणं फलंदाजांना कठीण जात आहे. गोलंदाजीतील या बदलाबाबत खुद्द कृणाल पांड्याने सांगितलं.

आयपीएल स्पर्धेतील बाउंसर कामगिरीबाबत कृणाल पांड्या म्हणाला की, ‘मी कायम वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. नवी रणनिती आखण्यापासून मी कधीच मागे हटलो नाही. इम्पॅक्ट प्लेयर नियमापूर्वी, अष्टपैलू खेळाडू सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायचे, पण आता या नियमामुळे फलंदाज आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करू शकतात.’ कृणाल पांड्याने 4 सामन्यात 5 विकेट काढले आहेत. त्याने 9.07 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.

‘मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकतो. चौथा, पाचवा किंवा सहावा चेंडू बाउन्सर टाकायचा आहे, असं मी आधीच ठरवत नाही. असेही दिवस असतात जेव्हा मी एकापाठोपाठ दोन बाउन्सर टाकतो आणि अचानक पहिला आणि सहावा चेंडूही टाकतो. त्यामुळे, अशा काही योजना नसतात, तर कोणता चेंडू केव्हा टाकायचा हे पूर्णपणे अंतर्मनाच्या आवाजावर अवलंबून असतं.’, असं कृणाल पांड्या म्हणाला.

कृणाल पांड्या पुढे म्हणाला की, ‘मुकुल आणि वैभवसारखे फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण करू शकतात. त्यामुळे मला नेहमी फलंदाजांच्या एक पाऊल पुढे राहायचे असते. मी अशा गोष्टी करू शकत असल्याचा मला आनंद आहे. या फॉरमॅटमध्ये फिंगर स्पिनर्स महत्त्वाचे राहतील. लोक नेहमी माझ्या बाउन्सरबद्दल बोलतात, पण मला माझ्या मूळ गोष्टींवरच लक्ष केंद्रित करायचे आहे.’

Follow Us