कृणाल पंड्यावर मोठ्या स्पर्धेआधी संघनेतृत्व सोडण्याची वेळ, मैदानातल्या शिवराळ भाषेमुळे ओढावली नामुष्की

खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून डच्चू मिळालेल्या कृणाल पंड्याला बडोदा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार व्हावं लागलं आहे. या अष्टपैलू खेळाडूने देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय घेत बडोदा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

कृणाल पंड्यावर मोठ्या स्पर्धेआधी संघनेतृत्व सोडण्याची वेळ, मैदानातल्या शिवराळ भाषेमुळे ओढावली नामुष्की
Krunal Pandya

मुंबई : खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून डच्चू मिळालेल्या कृणाल पंड्याला बडोदा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार व्हावं लागलं आहे. या अष्टपैलू खेळाडूने देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय घेत बडोदा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. कृणालने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Krunal Pandya resigns as Baroda captain, Kedar Devdhar to Lead team)

क्रुणालने बोर्डाचे अध्यक्ष प्रणव अमीन यांना हा मेल पाठवला असून त्यात लिहिले आहे की, “मला तुम्हाला कळवायचे आहे की, “मी सुरु होणाऱ्या देशांतर्गत हंगामात बडोद्याच्या कर्णधारपदासाठी उपलब्ध असणार नाही. मात्र, संघात निवडीसाठी मी उपलब्ध असेन. संघाचा सदस्य म्हणून मी माझं बेस्ट देईन. संघहितासाठी मी पूर्ण योगदान देईन.”

कृणालच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी चांगली नव्हती. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये संघ ब गटात शेवटच्या स्थानी होता. पाच सामन्यांत संघाला फक्त एकच सामना जिंकता आला, त्यामुळे बडोद्याला बाद फेरीत स्थान मिळवता आले नाही. या काळात कृणालची कामगिरीही चांगली नव्हती. त्याने पाच सामन्यांमध्ये केवळ 87 धावा केल्या ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. गोलंदाजीत तो मोठी कमाल करु शकला नाही. स्पर्धेत त्याला केवळ पाच विकेट्स घेता आल्या.

केदार देवधरकडे नेतृत्व

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, संघातील वरिष्ठ खेळाडू केदार देवधर संघाचा पुढील कर्णधार होऊ शकतो. दुसरीकडे, डावखुरा फिरकी गोलंदाज भार्गव भट्टला संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. हे दोघेही विजय हजारे ट्रॉफीमध्ये संघाचं नेतृत्व करताना दिसतील. पुढील महिन्यापासून ही स्पर्धा सुरू होत आहे.

दीपक हुड्डासोबतचा वाद चर्चेत

कृणाल पांड्याने गेल्या दोन मोसमात बडोदा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, यादरम्यान तो त्याच्या नेतृत्वगुण आणि खेळापेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत राहिला. दीपक हुड्डासोबतच्या वादामुळे क्रुणाल पंड्या प्रसिद्धीच्या झोतात आला. हुडाने क्रुणालवर वाईट वर्तनाचा आरोप केला होता आणि त्यानंतर तो बडोदा सोडून राजस्थानसाठी खेळू लागला होता. या मोसमात तो राजस्थानकडून मैदानात उतरला होता.

दीपक हुड्डाने बीसीएला ईमेलद्वारे क्रुणालची तक्रार केली होती. त्याने लिहिले होते की, “या क्षणी मी निराश, उदासीन आणि दबावाखाली आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून माझ्या संघाचा कर्णधार कृणाल पंड्या माझ्याविरुद्ध शिवराळ भाषेत बोलत आहे. तो माझ्या संघसहकाऱ्यांसमोर आणि राज्यांच्या संघातील खेळाडूंसमोर अपशब्द वापरत आहे.”

इतर बातम्या

Rahul chahar : भर मैदानात अंपायरवर का भडकला राहुल चहर? राहुल चहरनं अंपायसमोर केलं हे कृत्य…

Virat kohli : विराट कोहलीचा आणि युजवेंद्र चहलच्या बायकोचा हा नाद खुळा डान्स पहा, व्हिडिओ तुफान व्हायरल

Ind vs nz test series : दुसऱ्या कसोटीत कुणाला बाहेर बसावं लागणार? कोण मैदानात असणार?

(Krunal Pandya resigns as Baroda captain, Kedar Devdhar to Lead team)

Published On - 12:08 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI