LSG vs CSK IPL 2022: दुष्मंता चमीरा अंबाती रायुडूला Runout करायला विसरला, कृणाल पंड्या हैराण पहा VIDEO

LSG vs CSK IPL 2022: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आतापर्यंत निराशाजनक फिल्डिंग पहायला मिळाली आहे. मागच्या तीन-चार सामन्यात भरपूर मिसफिल्ड झाल्या आहेत.

LSG vs CSK IPL 2022: दुष्मंता चमीरा अंबाती रायुडूला Runout करायला विसरला, कृणाल पंड्या हैराण पहा VIDEO
लखनौ सुपर जायंट्स Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 11:14 PM

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आतापर्यंत निराशाजनक फिल्डिंग पहायला मिळाली आहे. मागच्या तीन-चार सामन्यात भरपूर मिसफिल्ड झाल्या आहेत. अनेकदा खेळाडूंनी चेंडू अडवल्यानंतर योग्य पद्धतीने थ्रो केला नसल्याचं सुद्धा पहाण्यात आलं आहे. यामुळे त्यांच्या हातून रन आऊटची संधी निसटतेय. काही वेळा चुकीच्या दिशेने थ्रो करण्यात आला आहे. सामना रोमांचक वळणावर असताना घाईगडबडीत असं होऊ शकतं. पण सतत असे प्रकार पाहून आश्चर्य वाटतं. लखनौ सुपर जायट्ंस आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात असंच झालं. याआधी KKR-RCB आणि RCB-KXIP च्या सामन्यात असे प्रकार पहायला मिळाले आहेत. आज लखनौ आणि चेन्नई सामन्यादरम्यानही 14 व्या षटकात असंच घडलं. त्यावेळी चेन्नईची बॅटिंग सुरु होती.

कोणाचं षटक सुरु होतं?

क्रुणाल पंड्या षटक टाकत होता. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर अंबाती रायुडूने पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या पॅडला लागून शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला. तिथे दुष्मंता चमीरा क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्याने चेंडू अडवला. पण योग्य वेळेत, योग्य ठिकाणी थ्रो केला नाही. या दरम्यान एक रनआऊटची संधी हुकली. अंबाती रायुडू नॉन स्ट्राइकवर पोहोचला नव्हता. खेळपट्टीच्या मधोमध होता. दुष्मंता चमीराने चेंडू वेगाने नॉन स्ट्राइकवर थ्रो केला असता, तर रायुडू रनआऊट होऊ शकला असता. हे पाहून कृणाल पंड्या सुद्धा निराश झाला.

हर्षल पटेलही रनआऊट करायला विसरला

आरसीबी आणि पंजाब किंग्स सामन्या दरम्यान हर्षल पटेलनेही अशीच चूक केली होती. शेवटच्या षटकांदरम्यान ही चूक झाली होती. चेंडू हर्षलच्या हातात आला होता. पण त्याने स्टम्पस उडवले नाहीत. त्यावेळी पंजाब किंग्सचा फलंदाज क्रीझ बाहेर होता.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.