AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs CSK IPL 2023 : लखनौ विरुद्ध चेन्नई सामना अखेर रद्द

LSG vs CSK IPL 2023 : लखनौ विरुद्ध चेन्नई सामना अखेर रद्द झाला आहे. चेन्नईच्या स्पिनर्सनी आज लखनौमध्ये आपला जलवा दाखवला. पण हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. लखनौचा आयुष बदोनी प्रतिकुल परिस्थितीत चांगला खेळला.

LSG vs CSK IPL 2023 : लखनौ विरुद्ध चेन्नई सामना अखेर रद्द
| Updated on: May 03, 2023 | 7:19 PM
Share

लखनौ : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना अखेर पावसामुळे रद्द झाला आहे. एमएस धोनीने टॉस जिंकला. चेन्नई सुपर किंग्सने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या बॉलर्सनी धोनीचा निर्णय योग्य ठरवला. पावरप्लेच्या तीन ओव्हर्समध्ये लखनौची टीम बॅकफुटवर होती. पावरप्लेच्या 6 ओव्हर अखेरीस लखनौची 3 बाद 31 धावा अशी स्थिती होती. चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांच या सामन्यात वर्चस्व दिसून आलं.

काइल मेयर्स, मनन व्होरा ही सलामीची जोडी 27 धावात तंबुत परतली होती. मेयर्सने 14 आणि मननने 10 धावा केल्या. लखनौचा नवीन कॅप्टन क्रृणाल पंड्या खातही उघडू शकला नाही. तीक्ष्णाने त्याला रहाणेकरवी झेलबाद केलं. करण शर्मा 9 आणि मार्कस स्टॉयनिस 6 रन्सवर जाडेजाच्या एका अप्रतिम चेंडूवर बोल्ड झाला. 44 धावात लखनौची निम्मी टीम तंबूत परतली होती.

आयुष बदोनीचा सरस खेळ

आयुष बदोनीने आज अप्रतिम बॅटिंग केली. त्याने आधी निकोलस पूरनसोबत (20) मिळून डाव सावरला. तो 33 चेंडूत 59 रन्सवर खेळत असताना पावसाला सुरुवात झाली. त्याने 2 फोर आणि 4 सिक्स मारले. 19.2 ओव्हर्समध्ये 7 बाद 125 धावा झालेल्या असताना पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही. अखेर अंपायर्सना मॅच रद्द झाल्याचं जाहीर करावा लागलं. लखनौच्या पीचवर चेन्नईच्या स्पिनर्सची कमाल

लखनौच्या पीचवर चेन्नईच्या स्पिनर्सनी कमाल केली. मोइन अलीने 4 ओव्हरमध्ये 13 रन्स देऊन 2 विकेट घेतल्या. माहीश तीक्ष्णाने 2 ओव्हरमध्ये 11 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. रवींद्र जाडेजाने किफायती गोलंदाजी केली. त्याने 3 ओव्हर्समध्ये 11 रन्स देऊन एक विकेट काढला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.