AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians IPL 2023 : कॅमरुन ग्रीनला दोष देण्यात अर्थ नाही, खंरतर Rohit sharma चा एक मोठा निर्णय चुकला

Mumbai Indians IPL 2023 : रोहित शर्मा चांगला खेळला, मग तो पराभवासाठी कसा जबाबदार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?. या मॅचमध्ये रोहित शर्माने कॅप्टन म्हणून एक चूक केली. ज्याची किंमत टीमला चुकवावी लागली.

Mumbai Indians IPL 2023 : कॅमरुन ग्रीनला दोष देण्यात अर्थ नाही, खंरतर Rohit sharma चा एक मोठा निर्णय चुकला
| Updated on: May 17, 2023 | 1:49 PM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्सचे फॅन्स सध्या खूप निराश आहेत. IPL 2023 च्या 63 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा अवघ्या 5 रन्सनी पराभव झाला. मुंबई ही मॅच आरामात जिंकणार होती. पण लखनऊ सुपर जायंट्सच्या मोहसीन खानने लास्ट ओव्हरमध्ये बाजी पलटली. त्याने लास्ट ओव्हरमध्ये 11 धावांचा यशस्वी बचाव केला. टिम डेविड-कॅमरुन ग्रीन सारखे स्फोटक फलंदाज क्रीजवर असूनही मुंबईने लास्ट ओव्हरमध्ये फक्त 5 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर या दोन खेळाडूंवर सातत्याने प्रश्न निर्माण करण्यात येतोय. खरंतर टिम डेविडने हाणामारीच्या ओव्हर्समध्ये मोठे फटके मारले. पण काही चेंडू त्याने निर्धाव सुद्धा खेळले. या चेंडूवर रन्स निघाले असते, तर निकालच चित्र बदललं असतं.

रोहित शर्माच काय चुकलं?

मुंबई इंडियन्सच्या पराभवाला रोहित शर्माचा एक निर्णय सुद्धा जबाबदार आहे. तुम्ही म्हणाला ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माने 25 चेंडूत 37 धावा केल्या, मग तो मुंबई इंडियन्सच्या पराभवाला कसा जबाबदार आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माने कॅप्टन म्हणून एक चूक केली. ज्याची किंमत टीमला चुकवावी लागली.

मोठे शॉट्स मारण्याआधी थोडा वेळ घेतो

कॅमरुन ग्रीनला लखनऊ विरुद्धच्या सामन्यात 7 व्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवलं. या खेळाडूने 6 चेंडूत 4 धावा केल्या. 17.50 कोटी रुपये किंमत असलेल्या खेळाडूकडून यापेक्षा चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की कॅमरुन ग्रीन काही चांगला फिनिशर नाहीय. टॉप ऑर्डरमधला बॅट्समन आहे. क्रीजवर मोठे शॉट्स मारण्याआधी थोडा वेळ घेतो. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ग्रीनला विष्णू विनोदच्या नंतर बॅटिंगसाठी पाठवलं. अचूक टप्प्यावर चेंडू

मुंबई इंडियन्सची टीम विजयाच्या जवळ होती. 19 व्या ओव्हरमध्ये टिम डेविडच्या हिटिंगने मुंबईचा विजय जवळपास निश्चित केला होता. 2 ओव्हर्समध्ये मुंबईला विजयासाठी 30 धावांची गरज होती. टिम डेविडने नवीन उल हकच्या ओव्हरमध्ये 2 सिक्सच्या मदतीने 19 धावा चोपल्या. त्यानंतर मुंबई लास्ट ओव्हरमध्ये आरामात 11 रन्स बनवेल असं वाटलं होतं. पण मोहसीन खानने अचूक टप्प्यावर बॉलिंग करुन टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीनला मोठे फटके खेळण्यापासून रोखलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.