Suryakumar Yadav : लखनौ पीच वादावर सूर्याचं हार्दिकपेक्षा वेगळं वक्तव्य, क्यूरेटरला हटवलं

Suryakumar Yadav : सीरीजमध्ये पीचवरुन आतापर्यंत बराच वाद झालाय. खासकरुन लखनौ पीचच्या वादावरुन टेन्शन आणखी वाढलय. या वादात आता टीम इंडियाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवने वक्तव्य केलय.

Suryakumar Yadav : लखनौ पीच वादावर सूर्याचं हार्दिकपेक्षा वेगळं वक्तव्य, क्यूरेटरला हटवलं
suryakumar-yadavImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 7:35 AM

IND vs NZ 3rd ODI : टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आज बुधवारी सीरीजमधील तिसरा टी 20 सामना खेळला जाणार आहे. या सीरीजमध्ये पीचवरुन आतापर्यंत बराच वाद झालाय. खासकरुन लखनौ पीचच्या वादावरुन टेन्शन आणखी वाढलय. या वादात आता टीम इंडियाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवने वक्तव्य केलय. “लखनौच्या मॅचनंतर आम्ही पीचबद्दल चर्चा केली. आम्ही ठरवलय, यापुढे पीच कसाही असो, आम्ही खेळू त्याबद्दल कुठलीही तक्रार करणार नाही” असं सूर्यकुमार यादव अहमदाबाद येथील प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला.

सूर्यकुमार काय म्हणाला?

“तुम्ही कुठल्या विकेटवर खेळताय हे महत्त्वाच नाही. कारण या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. आमच्या कंट्रोलमध्ये जे होतं, ते आम्ही केलं. आम्हाला परिस्थितीनुसार, खेळाव लागेल आणि आम्ही तसच खेळण्याचा प्रयत्न केला” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

हार्दिक पंड्यापेक्षा बिलकुल उलट वक्तव्य

सूर्यकुमार यादवच वक्तव्य हार्दिक पंड्यापेक्षा बिलकुल उलट आहे. हार्दिकने लखनौची विकेट T20 मॅचच्या लायक नव्हती, असं म्हटलं. हार्दिकने या विकेटवर टीका केली होती. त्यानंतर लखनौच्या पीच क्यूरेटरला हटवण्यात आलं.

नेमका वाद काय?

लखनौच्या सामन्यासाठी पीच क्यूरेटरने आधी काळी खेळपट्टी बनवली होती. पण टीम मॅनेजमेंटच्या सांगण्यावरुन त्याने अत्यंत कमी वेळेत लाल पीच बनवला. पीच बनवण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही. या विकेटवर 100 रन्सचा टार्गेट गाठताना टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली. आता प्रश्न हा आहे की, पीच क्यूरेटरला का हटवलं?

जे सांगितलं, ते त्याने ऐकलं

यात पीच क्यूरेटरची चूक काय? त्याला टीम इंडियाकडून जे सांगण्यात आलं, ते त्याने ऐकलं. इतक्या कमी वेळेत काय करणार? काळा पीच लाल मातीचा बनवण्यास का सांगण्यात आलं? हा सुद्धा प्रश्न आहे. लाल आणि काळ्या माचीच्या पीचमध्ये फरक काय?

लाल माती आणि काळ्या मातीच्या पीचमध्ये काय फरक असतो, ते समजून घ्या. लाल मातीच्या पीचवर जास्त पेस आणि बाऊन्स असतो. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पीच लाल मातीने बनवला जातो. तिथे बॅट्समन सहज ड्राइव्ह मारु शकतात. दुसरीकडे काळ्या मातीच्या पीचवर चेंडू थोड्या फसव्या पद्धतीने बॅटवर येतो. स्पिनर्सना टर्न मिळतो. धावा करण्यासाठी बॅट्समनला खेळपट्टीवर पाय रोवून उभं रहावं लागतं. टी 20 क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे पीच फार कमी पहायला मिळतात.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.