AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला सोडलं, आता या खेळाडूवर नजर! सीएसकेला दिली ऑफर

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोतून खेळाडूंच्या देवाणघेवाणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक फ्रेंचायझी मागील स्पर्धेचा हिशेब करून मांडणी करत आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला एक मोठी ऑफर दिल्याचं बोललं जात आहे.

लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला सोडलं, आता या खेळाडूवर नजर! सीएसकेला दिली ऑफर
लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला सोडलं, आता या खेळाडूवर नजर! सीएसकेला दिली ऑफरImage Credit source: PTI
| Updated on: Jul 24, 2026 | 7:08 PM
Share

आयपीएल 2027 स्पर्धेच्या मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडू अदलाबदली करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2026 संपल्यानंतरच या कामाला सुरूवात केली आहे. लखनौने कर्णधार ऋषभ पंतला रिलीज करत दिल्लीकडे सुपूर्द केलं. तर कुलदीप यादवला त्या बदल्यात आपल्या संघात घेतलं आहे. आता लखनौ सुपर जायंट्सने आणखी एक डाव टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ सुपर जायंट्सने थेट चेन्नई सुपर किंग्सशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्सने युवा आक्रमक फलंदाज उर्विल पटेलच्या बदल्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रेड करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. लखनौ सुपर जायंट्स आपल्या संघातील फलंदाजांची फळी मजबूत करण्यासाठी उर्विल पटेलला आपल्या संघात घेऊ इच्छिते.

मोहम्मद शमीच्या बदल्यात उर्विल पटेल

उर्विल पटेलला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 लिलावात फक्त 30 लाखात विकत घेतलं होतं. त्यानंतर त्याला 2025 आयपीएल पर्वात तीन डावात फलंदाजीची संधी मिळाली. त्यात त्याने 68 धावा केल्या. आयपीएल 2026 स्पर्धेत युवा फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतग्रस्त झाला आणि उर्विल पटेलला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं आणि 201.5 च्या स्ट्राईक रेटने 129 धावा केल्या. पण पुढच्या पर्वात आयुष म्हात्रे एन्ट्री झाल्यानंतर उर्विल पटेलला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळणं कठीण होऊ शकतं. ही शक्यता पाहता लखनौ सुपर जायंट्सने हा डाव टाकला आहे. यासाठी लखनौने स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

मोहम्मद शमीची चेन्नईला आवश्यकता

चेन्नईला पावरप्ले आणि डेथ ओव्हरमध्ये षटकं टाकण्यासाठी एका अनुभवी गोलंदाजाची गरज आहे. खलील अहमदला साथ देईल असा गोलंदाजाच्या शोधात चेन्नई सुपर किंग्स आहे. अशा स्थितीत मोहम्मद शमीच्या ट्रेडमुळे लाभ मिळू शकतो. स्पेंसर जॉन्सन आणि मॅट हेनरीसोबत शमी संघात आल्याने गोलंदाजीला आणखी धार चढेल. मागच्या पर्वातही मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादकडून लखनौने ट्रेड केलं होतं. त्याने आयपीएल 2026 च्या 13 सामन्यात 9 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या. पण आता टॉप ऑर्डर आक्रमक करण्यासाठी लखनौ शमीला सोडण्याची तयारी करत आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा