AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2027 पूर्वी MI आणि CSK मध्ये काय शिजतंय? हार्दिकच्या ट्रेडसाठी या खेळाडूंना सोडणार!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी अजून सात महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी बरंच काही घडताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मोठी डील होण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्यासाठी आता फिल्डिंग लावली जात आहे.

आयपीएल 2027 पूर्वी MI आणि CSK मध्ये काय शिजतंय? हार्दिकच्या ट्रेडसाठी या खेळाडूंना सोडणार!
आयपीएल 2027 पूर्वी MI आणि CSK मध्ये काय शिजतंय? हार्दिकच्या ट्रेडसाठी या खेळाडूंना सोडणार!Image Credit source: PTI
| Updated on: Jul 24, 2026 | 1:57 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर फ्रेंचायझींनी आता आपल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुढच्या पर्वात आपल्या संघाला जेतेपद मिळेल या दृष्टीने आता संघाची बांधणी केली जात आहे. पाच वेळा जेतेपदाची चव चाखलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझींची कामगिरी मागच्या काही वर्षात सुमार दर्जाची राहिली आहे. त्यामुळे आता खेळाडूंची आदलाबदलीने जोर धरला आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स तर आधीच ट्रेड करून मोकळे झाले आहेत. आता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी ट्रेड होण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्स व्यवस्थापन कर्णधार हार्दिक पांड्याच्या कामगिरीने निराश आहे. त्यामुळे त्याला संघातून बाहेर काढण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे.

धोनीच्या उपस्थितीत ट्रेडसाठी चर्चा

मिडिया रिपोर्टनुसार, आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद या फ्रेंचायझी वगळता इतर सर्व फ्रेंचायझींनी हार्दिकसाठी फिल्डिंग लावली आहे. पण या ट्रेडमध्ये चेन्नई सुपर किंग्स आघाडीवर आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरू असलेल्या ट्रेड कराराच्या चर्चेत महेंद्रसिंह धोनीदेखील आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे आणि शिवम दुबे यांची मागणी केली आहे. पण चेन्नई सुपर किंग्सने आयुष म्हात्रे सोडण्यास नकार दिली आहे. त्या ऐवजी दक्षिण अफ्रिकेच्या डेवॉल्ड ब्रेव्हिसला देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण यातही एक अट ठेवली आहे.

द हंड्रेड 2026 स्पर्धेनंतर ब्रेव्हिसचा निर्णय घेणार

चेन्नई सुपर किंग्स संघात असलेल्या डेवॉल्ड ब्रेव्हिसने मागच्या पर्वात सुमार कामगिरी केली होीत. त्याने 8 सामन्यात फक्त 151 धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी काही खास राहिली नही. त्याचा स्ट्राईक रेट 176.42 वरून 145.22 वर घसरला आहे. 11 सामन्यात त्याला फक्त 228 धावा करता आल्या आहे. त्यामुळे त्याला सोडण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला फार काही विचार करावा लागणार नाही. पण यातही चेन्नई सुपर किंग्सने एक अट ठेवली आहे. द हंड्रेड 2026 स्पर्धा सुरू आहे आणि ब्रेव्हिस एमआय लंडनकडून खेळत आहे. या स्पर्धेतील कामगिरीवर त्याला सोडायचं की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे.

डेवॉल्ड ब्रेव्हिसची कामगिरी निराशाजनक राहिली तर त्याला सोडण्याचं मन चेन्नई सुपर किंग्सने केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स हार्दिक पांड्याच्या बदल्यात मुंबईला शिवम दुबे आणि 10 कोटी देण्याच्या तयारी आहे. ब्रेव्हिसची कामगिरी खराब राहिली तर शिवम दुबेसह त्याचंही ट्रेड केलं जाईल. पण आता हा करार खरंच होणार का? हा देखील प्रश्न आहे. दोन्ही फ्रेंचायझींनी या ट्रेडबाबत अधिकृत असं काहीच सांगितलेलं नाही.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात