IPL 2024 : जसप्रीत बुमराह RCB मध्ये का? VIDEO बघा तुम्हाला असंच वाटेल

IPL 2024 : . आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. ही कॅप सध्या जसप्रीत बुमराहकडे आहे. त्याने यंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत 14 विकेट घेतले आहेत. परफेक्ट यॉर्कर आणि टप्प्यामुळे जसप्रीत बुमराह घातक गोलंदाज ठरतो.

IPL 2024 : जसप्रीत बुमराह RCB मध्ये का? VIDEO बघा तुम्हाला असंच वाटेल
जसप्रीत बुमराह याने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे. बुमराह अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. बुमराहने नक्की काय केलंय? जाणून घेऊयात.Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 10:24 AM

टीम इंडियाचा टॉप बॉलर कोण? हा प्रश्न कुठल्याही क्रिकेट प्रेमीला विचारला? तर त्याचं उत्तर असेल जसप्रीत बुमराह. खेळपट्टी कुठलीही असो, जसप्रीत बुमराह भेदक गोलंदाजी करणार. सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2024 च्या सीजनमध्ये जसप्रीत बुमराह प्रतिस्पर्धी टीमवर भारी पडतोय. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. ही कॅप सध्या जसप्रीत बुमराहकडे आहे. त्याने यंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत 14 विकेट घेतले आहेत. टीमला गरज असताना विकेट मिळवून देणं ही जसप्रीत बुमराहची खासियत आहे. परफेक्ट यॉर्कर आणि टप्प्यामुळे जसप्रीत बुमराह घातक गोलंदाज ठरतो. याच जसप्रीत बुमराहसारखा आणखी एक गोलंदाज तयार होतोय. त्याच नाव आहे महेश कुमार.

महेश कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा नेट बॉलर आहे. महेश कुमारची बॉलिंग Action बिलकुल जसप्रीत बुमराहसारखी आहे. त्याला बॉलिंग करताना पाहून बुमराहच गोलंदाजी करतोय असं वाटतं. याच आपल्या Action मुळे महेश कुमार सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर महेश कुमारच्या गोलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर तो चर्चेत आलाय. RCB च्या नेट बॉलरची Action जसप्रीत बुमराहशी एकदम मिळती-जुळती आहे. जसप्रीत बुमराहची गोलंदाजीची स्टाईल पारंपारिक बॉलिंगपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पण तो आज जगातला एक घातक वेगवान गोलंदाज आहे.

विराट कोहलीने 10 मॅचमध्ये किती धावा केल्यात?

RCB साठी यंदाचा सीजन खूपच खराब ठरलाय. विराट कोहली एकाबाजूने धावांचा पाऊस पाडतोय. पण आरसीबीची टीम अपयशी ठरतेय. पॉइंट्स टेबलमध्ये आरसीबीच्या खात्यावर फक्त 6 पॉइंट्स आहेत. 10 सामन्यात फक्त 3 विजय मिळवले आहेत. RCB पॉइंट्स टेबलमध्ये तळाला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून अजून RCB ची टीम बाहेर गेलेली नाही. पण टिकून राहण्यासाठी यापुढचा प्रत्येक सामना जिंकणं, त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. विराट कोहली चालू सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 4 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. 10 सामन्यात कोहलीने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.