AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul मुळे त्याच्याकडे दुर्लक्ष, आता थेट डबल सेंच्युरी ठोकून सिलेक्टर्सना दिलं सडेतोड उत्तर

केएल राहुलमुळे त्याच करिअर धोक्यात आहे. त्याला संधी मिळत नाहीय. आता डबल सेंच्युरी ठोकून सिलेक्टर्सना दिलं सडेतोड उत्तर. टीम इंडियाकडून खेळलेल्या एक टॅलेंटेड आणि खतरनाक खेळाडूच करिअर केएल राहुलमुळे जवळपास संपुष्टात आलय.

KL Rahul मुळे त्याच्याकडे दुर्लक्ष, आता थेट डबल सेंच्युरी ठोकून सिलेक्टर्सना दिलं सडेतोड उत्तर
KL Rahul Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jan 20, 2023 | 8:20 AM
Share

Team India Cricketer: टीम इंडियाकडून खेळलेल्या एक टॅलेंटेड आणि खतरनाक खेळाडूच करिअर केएल राहुलमुळे जवळपास संपुष्टात आलय. आता अचानक या प्लेयरने आपली क्षमता दाखवून देत डबल सेंच्युरी ठोकली आहे. या खेळाडूने डबल सेंच्युरीच्या बळावर सिलेक्टर्सना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. केएल राहुलमुळे या प्लेयरला टीमबाहेर करण्यात आलं होतं. या खेळाडूला टीम इंडियाच भविष्य म्हटलं जायच. हा खेळाडू टीम इंडियाकडून ओपनिंगला यायचा. काही सामन्यातील खराब प्रदर्शनानंतर त्याला टीम बाहेर करण्यात आलं. पण केएल राहुलला सातत्याने अपयशी ठरुनही संधी दिली जातेय. या प्लेयरच नाव आहे मयंक अग्रवाल. मयंकने सुरुवातीच्या 12 टेस्ट इनिंगमध्ये भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये 2 द्विशतक झळकावली आहेत.

टीम इंडियातून शेवटचा वनडे सामना कधी खेळला?

मयंक अग्रवालवर टीम इंडियात केएल राहुलमुळे दुर्लक्ष झालं. त्यानंतर त्याचा वनडे आणि टेस्ट टीममधून पत्ता कट झाला. मयंक अग्रवाल आता टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय. खोऱ्याने धावा करतोय. पण सिलेक्टर्स त्याला संधी देत नाहीयत. मयंक अग्रवाल आपला शेवटचा वनडे सामना वर्ष 2020 मध्ये खेळला होता. 2022 मार्चमध्ये मयंक शेवटचा कसोटी सामना खेळला. केरळ विरुद्ध महत्त्वपूर्ण आघाडी

राहुलच्या डबल सेंच्युरीमुळे कर्नाटकने रणजी ट्रॉफीच्या ग्रुप सी मॅचमध्ये गुरुवारी केरळ विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. कर्नाटकने काल सकाळी दोन बाद 137 वरुन डाव पुढे सुरु केला. कॅप्टन मयंक अग्रवालने 360 चेंडूत 208 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त होताना कर्नाटकच्या 6 बाद 410 धावा झाल्या होत्या. केरळने आपल्या पहिल्या डावात 342 धावा केल्या होत्या.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.