AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Athiya Shetty-KL Rahul wedding: अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरू; समोर आला पहिला व्हिडीओ

केएल राहुलच्या मुंबईतल्या घरी लग्नाची लगबग पहायला मिळतेय. याचा पहिला व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर आला आहे. पापाराझींनी या घराबाहेरचे व्हिडीओ शूट केले आहेत.

Athiya Shetty-KL Rahul wedding: अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरू; समोर आला पहिला व्हिडीओ
Athiya Shetty, KL RahulImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 18, 2023 | 8:14 AM
Share

मुंबई: आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटरची जोडी लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. केएल राहुलच्या मुंबईतल्या घरी लग्नाची लगबग पहायला मिळतेय. याचा पहिला व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर आला आहे. पापाराझींनी या घराबाहेरचे व्हिडीओ शूट केले आहेत. येत्या 23 जानेवारी रोजी केएल राहुल आणि अथिया लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.

केएल राहुलच्या मुंबईतल्या घराला सजावट करण्यात येत आहे. रोषणाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अथियाचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर हे लग्न पार पडणार असल्याचं कळतंय. 21 जानेवारीपासून या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

संगीत कार्यक्रमात अथियाचे मित्रमैत्रिणी, भाऊ अहान शेट्टी, आई माया शेट्टी आणि वडील सुनील शेट्टी हे डान्स परफॉर्म करणार असल्याचंही समजतंय. या लग्नाला बॉलिवूडमधील फार कमी सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

अथिया आणि केएल राहुल हे त्यांच्या रिलेशनशिपविषयी माध्यमांसमोर कधीच मोकळेपणे बोलले नाहीत. मात्र सोशल मीडियावर एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्यात दोघंही कधीच मागे हटत नाहीत. अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या ‘तडप’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला जेव्हा केएल राहुलने हजेरी लावली, तेव्हा अप्रत्यक्षपणे त्यांनी नात्याची जाहीर घोषणा केली होती. यावेळी दोघांनी पापाराझींना फोटोसाठी एकत्र पोझ दिले होते.

अथियाने 2015 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती मुबारकां (2017) आणि मोतीचूर चकनाचूर (2019) या दोन चित्रपटांमध्येच झळकली आहे. अथिया लवकरच फुटबॉलपटू अफशान आशिकचा बायोपिक ‘होप सोलो’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.