AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Athiya Shetty: अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तारीख ठरली? सुनील शेट्टी यांनी दिलं चर्चांवर उत्तर

अथिया आणि राहुलचे कुटुंबीय नुकतेच मुंबईत एकमेकांना भेटले होते आणि या भेटीदरम्यान लग्नाबाबतही चर्चा झाली होती. अथिया आणि राहुल लग्नानंतर ज्या नवीन घरात राहतील ते घरसुद्धा पाहण्यासाठी दोघं कुटुंबीय गेले होते, असं म्हटलं गेलं.

Athiya Shetty: अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तारीख ठरली? सुनील शेट्टी यांनी दिलं चर्चांवर उत्तर
अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तारीख ठरली? Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 9:59 AM
Share

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून येत्या 3 महिन्यांत अथिया आणि राहुल लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता अथियाचे वडील सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांनी उत्तर दिलं आहे. ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, अथिया आणि राहुलचे कुटुंबीय नुकतेच मुंबईत एकमेकांना भेटले होते आणि या भेटीदरम्यान लग्नाबाबतही चर्चा झाली होती. अथिया आणि राहुल लग्नानंतर ज्या नवीन घरात राहतील ते घरसुद्धा पाहण्यासाठी दोघं कुटुंबीय गेले होते, असं म्हटलं गेलं. पुढील तीन महिन्यांत अथिया आणि राहुल मुंबईत लग्नबद्ध होऊ शकतात, असं याच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.

काय म्हणाले सुनील शेट्टी?

आता सुनील शेट्टी यांनी लग्नाच्या या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत सुनील शेट्टींना विचारण्यात आलं की, “दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे का?” त्यावर उत्तर देताना ते रेडिओ मिर्चीवर म्हणाले, “नाही, अजून कसलंही नियोजन झालेलं नाही.” काही दिवसांपूर्वी अथियाचा भाऊ अहान यानेसुद्धा असंच उत्तर दिलं होतं. दैनिक भास्करशी बोलताना तो म्हणाला होता, “जोपर्यंत लग्नाचा प्रश्न आहे, अद्याप कोणतीही व्यवस्था झालेली नाही. असं काहीही घडलेलं नाही. या सर्व केवळ अफवा आहेत. लग्न ठरलेलं नसताना आम्ही तुम्हाला तारीख कशी सांगू?”

इन्स्टा पोस्ट-

अथिया शेट्टीबद्दल बोलायचे झाल्यास तिने 2015 मध्ये सूरज पांचोलीसोबत ‘हिरो’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती अर्जुन कपूरसोबत ‘मुबारका’ आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 2019 मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात दिसली आहे. आता अथिया लवकरच फुटबॉलपटू अफशान आशिकचा बायोपिक ‘होप सोलो’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त आहे.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....