
टीम इंडिया नववर्षात 2026 मध्ये मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडियाची नववर्षातील एकूण पहिली एकदिवसीय मालिका असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे आणि त्यानंतर 5 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही संघांचा या मालिकेत विजय मिळवून नववर्षाची दणक्यात सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाने सरत्या वर्षात अर्थात 2025 मध्ये काय कमावलं आणि काय गमावलं? याचा आपण सविस्तर आढावा या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20I क्रिकेटमध्ये लाजवाब कामगिरी केली. भारताने गतविजेता म्हणून आपला दबदबा कायम राखला. कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि त्यानंतर शुबमन गिल या दोघांनी वनडेत उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने टी 20I आणि वनडेत चांगली कामगिरी केली. मात्र भारताची कसोटी क्रिकेटमध्ये तितकीच निराशाजनक कामगिरी राहिली. भारताने 2025 या वर्षात तिन्ही फॉर्मेटमध्ये...