AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC : रोमरियो शेफर्ड-टीम डेव्हीडची वादळी खेळी, दिल्लीला विजयासाठी 235 आव्हान

ipl 2024 MI vs DC 1st Innings Highlights In Marathi : रोमरियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड या जोडीने विस्फोटक फलंदाजी करत मुंबईला मोठी धावसंख्या उभारून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.

MI vs DC : रोमरियो शेफर्ड-टीम डेव्हीडची वादळी खेळी, दिल्लीला विजयासाठी 235 आव्हान
romario shepherd and tim david,
| Updated on: Apr 07, 2024 | 6:03 PM
Share

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 234 धावा केल्या. रोमरियो शेफर्ड याने 20 व्या ओव्हरमध्ये केलेल्या 32 धावांच्या जोरावर मुंबईला 230 पार मजल मारता आली. तसेच मुंबईने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये 96 धावा केल्या. मुंबईने 234 धावांसह वानखेडे स्टेडियम या आपल्या होम ग्राउंडमध्ये इतिहास रचला. मुंबई आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारी टीम ठरली.

मुंबईची बॅटिंग

दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या फलंदाजांनी या संधीचा चांगला फायदा घेतला. रोहित शर्मा आणि ईशान किशन या दोघांनी 80 धावांची सलामी भागीदारी केली. रोहित शर्मा 27 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह 49 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर मुंबईची घसरगुंडी झाली. दिल्लीने मुंबईला ठराविक अंतराने 3 झटपट धक्के दिले.

सूर्यकुमार यादव याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो आला तसाच गेला. सूर्याला 2 बॉलमध्ये भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर ईशान किशन सेट बॅट्समन 23 बॉलमध्ये 42 धावांवर बाद झाला. तिलक वर्मा याने निराशा केली. तिलक 6 धावावंर बाद झाला. त्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या आणि टीम डेव्हिड या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. डेव्हिड आणि हार्दिक या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. त्यानंतर हार्दिक 33 बॉलमध्ये 39 धावा करुन आऊट झाला. हार्दिक मुंबईच्या डावातील 17.5 व्या बॉलवर 181 धावसंख्या असताना बाद झाला. त्यानंतर 13 बॉलमध्ये मुंबईने 53 धावा केल्या.

रोमरिया शेफर्ड आणि टीम डेव्हिड या दोघांनी सहाव्या विकेटसाठी उर्वरित 13 बॉलमध्ये मैदानात चौफेर फटकेबाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांची पिसं काढली. रोमरियो शेफर्ड याने तर 20 व्या ओव्हरमध्ये सामन्याला कलाटणी देणारी खेळी केली. रोमरियोने या अखेरच्या षटकात एनरिच नॉर्तजे याची धुलाई केली. रोमरियोने 4,6,6,6,4,6 अशी फटकेबाजी करत 32 धावा कुटल्या. तर दिल्लीकडून अक्षर पटेल आणि एनरिच नॉर्तजे या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर खलील अहमद याच्या खात्यात 1 विकेट गेली.

रोमरियोचा झंझावात

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.