दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या होत्या. विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबई इंडिन्सचा संघ 247 धावा करू शकला आणि 10 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
मोहम्मद नबी 4 चेंडूत 7 धावा करून बाद झाला आहे.
टिम डेविडने 17 चेंडूत 37 धावा केल्या. मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने मुंबई इंडियन्सवर दबाव वाढला आहे.
तिलक वर्माची विजयासाठी झुंज सुरु आहे. 25 चेंडूत 50 धावा ठोकल्या. मात्र अजूनही धावा आणि चेंडूमधील अंतर वाढलं आहे.
नेहल वढेराचा डाव अवघ्या 4 धावांवर आटोपला. पहिल्या चेंडूवर चौकार मारला. पण रसिख सलामच्या दुसऱ्याच चेंडूवर झेल देऊन बसला. ऋषभ पंतने यष्टीमागे त्याचा झेल घेतला.
हार्दिक पांड्या 24 चेंडूत 46 धावा करून बाद झाला आहे. हार्दिक पांड्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. पण रसिख सलामच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला आणि मुकेश कुमारने झेल पकडला.
सूर्यकुमार यादव 13 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. खलील अहमदने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला आहे. इशान किशन 20 धावा करून तंबूत परतला आहे. मुकेश कुमारने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
रोहित शर्मा 8 चेंडूत 8 धावा करून तंबूत परतला आहे. खलील अहमदच्या गोलंदाजीवर शाई होपने त्याचा झेल घेतला.
दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 120 चेंडूत 257 धावा केल्या आणि विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं आहे.
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत तंबूत परतला आहे. त्याने 19 चेंडूत 29 धावा केल्या.
शाई होपने ऋषभ पंतसोबत अर्धशतकी भागीदारी काली. 17 चेंडूत 5 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या आणि तंबूत परतला. तिलक वर्माने त्याचा अप्रतिम झेल पकडला.
अभिषेक पोरेल 36 धावांवर तंबूत परतला आहे. मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर इशान किशनने झेल घेतला.
जेक फ्रेझर मॅकगर्क 27 चेंडूत 84 धावा करून तंबूत परतला आहे. पियुष चावलाच्या गोलंदाजीवर मोहम्मद नबीने त्याचा झेल घेतला. त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले.
पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक पोरेलने 13 चेंडूत 11, तर जेक फ्रेझर मॅकगर्कने 24 चेंडूत 78 धावांची खेळी केली.
फ्रेझर मॅकगर्कने दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. फ्रेझर मॅकगर्कने 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
जॅक फ्रेझर मॅकगर्क पहिल्या षटकात ल्यूक वूडची धुलाई केली. पहिल्याच षटकात 19 धावा ठोकल्या.
हार्दिक पांड्याने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. मैदान लहान असून दुसरी फलंदाजी करणे चांगले राहील.” दुसरीकडे, ऋषभ पंत म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. मला वाटतं की दुसऱ्या डावात त्याचा वेग कमी होईल.”
दिल्ली कॅपिटल्स इम्पॅक्ट सब्स: रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, रिकी भुई, सुमित कुमार.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट सब्स: सूर्यकुमार यादव, नमन धीर, शम्स मुलानी, देवाल्ड ब्रेविस, कुमार कार्तिकेय.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सने जिंकला. हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नोर्त्झे, खलिल अहमद, मुकेश कुमार.
मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह.
सरड्याला सुद्धा लाजवेल असा रंग संजय राऊत बदलत आहेत. संभाजी महाराजांना राज्यसभेची राष्ट्रपती कोट्यातून उमेदवारी देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला आहे, उलट संजय राऊतांनी काय केलं ते सांगावं ? असे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.
ज्योती मेटे घेत आहेत शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. राज्यभरातून सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित. शिवसंग्राम संघटनेचा नेमका पाठिंबा कुणाला महायुती की महाविकास आघाडी ? आजच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 34 सामने झाले आहेत. त्यापैकी 19 सामन्यात मुंबई इंडियन्सने, तर 15 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आहे. या दोघांमध्ये 35 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होत आहे.
आयपीएल स्पर्धेच्या 43व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला होता. मात्र दिल्लीने आक्रमक सुरुवात करत 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या आणि विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्स संघ 9 गडी गमवून 247 धावा करू शकला आणि 10 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मुंबईचा संघ गुणातालिकेत नवव्या, तर दिल्लीने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.