MI vs SRH : मुंबईचा वानखेडेत धमाका, हैदराबादसमोर सर्वात मोठा विक्रम

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad 1st Inning Highlight, IPL 2026 : सनरायजर्स हैदराबादला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सहावा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 12.20 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत. मुंबईने हैदराबादसमोर 244 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.

MI vs SRH : मुंबईचा वानखेडेत धमाका, हैदराबादसमोर सर्वात मोठा विक्रम
Ryan Rickelton and Hardik Pandya MI vs SRH IPL 2026
Image Credit source: Mipaltan x account
| Updated on: Apr 30, 2026 | 6:23 AM

मुंबई इंडियन्सला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये सलग 3 पराभवांचा सामना करावा लागलाय. मात्र त्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केलं आहे. मुंबईने आपल्या घरच्या मैदानात 29 एप्रिलला स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. मुंबईने हैदराबादसमोर 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 243 धावांचा डोंगर उभा केला आहे. मुंबईची ही तिसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादला 244 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता मुंबई या 243 धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरते की हैदराबाद सामना जिंकते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईची बॅटिंग

कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय सहकाऱ्यांनी योग्य ठरवला. रायन रिकेल्टन आणि विल जॅक्स या सलामी जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत मुंबईला अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी पावरप्लेचा पूर्ण फायदा घेतला. पावरप्लेमधील पहिल्या 6 ओव्हरमध्ये फिल्डिंग लावण्यात बंधनं असतात.त्यामुळे फलंदाजांना फटकेबाजी करुन जास्तीत जास्त धावा करण्याची संधी असते.

मुंबईची अप्रतिम सुरुवात

विल आणि रायन या दोघांनी 43 बॉलमध्ये 93 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. त्यानंतर विलच्या रुपात मुंबईने पहिली विकेट गमावली. विलने 22 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह 46 रन्स केल्या. विलनंतर मुंबईने 17 धावांच्या अंतराने दुसरी विकेट गमावली. सूर्यकुमार यादव याने पुन्हा निराशा केली. सूर्याचं 5 धावांवर पॅकअप झालं.

त्यानंतर रायनने नमन धीर आणि कॅप्टन हार्दिक पंड्या या दोघांसह तिसऱ्या-चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. नमन आणि रायन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 31 बॉलमध्ये 55 रन्सची पार्टनरशीप केली. नमनने 22 रन्स केल्या.

स्कोअरकार्ड


तसेच हार्दिक पंड्या आणि रायन या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 27 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. हार्दिकने 31 धावा जोडल्या. तिलकने 7 धावा केल्या. तर रायन आणि रॉबिन मिन्झ ही जोडी नाबाद परतली. रॉबिनने 1 धाव केली. तर रायनने 55 चेंडूत नाबाद 123 धावांची खेळी केली.

रायनची विक्रमी खेळी

रायन यासह मुंबईसाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. रायनने 55 बॉलमध्ये 223.64 च्या सरासरीने नॉट आऊट 123 रन्स केल्या. रायनने या दरम्यान 8 षटकार आणि 10 चौकार लगावले. तसेच हैदराबादकडून प्रफुल हिंगे याने 2 विकेट्स मिळवल्या. तर एशान मलिंगा, नितीश कुमार रेड्डी आणि साकिब हुसैन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us