AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MIW vs GGW : मुंबईला गुजरात विरूद्धच्या सामन्यात मोठा झटका, मॅचविनर ऑलराउंडर बाहेर, नवी मुंबईत पलटणची बॉलिंग

WPL 2026 Mumbai Indians vs Gujarat Giants Women Toss Result and Playing 11 : मुंबई आणि गुजरात दोन्ही संघ चौथ्या मोसमातील आपल्या तिसऱ्या सामन्यात प्रत्येकी एका बदलासह मैदानात उतरले आहेत. मुंबईच्या मॅचविनर खेळाडूला टीममधून बाहेर व्हावं लागलं आहे.

MIW vs GGW : मुंबईला गुजरात विरूद्धच्या सामन्यात मोठा झटका, मॅचविनर ऑलराउंडर बाहेर, नवी मुंबईत पलटणची बॉलिंग
Mumbai Indians vs Gujarat Giants Toss Wpl 2026Image Credit source: WPL X Account
| Updated on: Jan 13, 2026 | 7:40 PM
Share

डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील सहाव्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स वूमन्स हे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना आहे. गुजरात या मोसमात अजिंक्य आहे. गुजरातने एश्ले गार्डनर हीच्या नेतृत्वात दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुजरात मुंबई विरुद्ध सलग तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर मुंबईची या मोसमात पराभवाने सुरुवात झाली. मुंबईला या मोसमातील सलामीच्या सामन्यात आरसीबीकडून पराभूत व्हावं लागलं. मात्र मुंबईने दुसऱ्या सामन्यात दिल्लीवर मात करत विजय मिळवला. आता मुंबईचा आपल्या तिसर्‍या सामन्यात विजयी ट्रॅकवर कायम राहण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबईची बॉलिंग, गुजरातला किती धावांवर रोखणार?

मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.त्याआधी 7 वाजता मुंबईने टॉस जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.मुंबईला या सामन्यात मोठा झटका लागला आहे.

नॅट सायव्हर ब्रँट आऊट

मुंबईची मॅचविनर ऑलराउंडर नॅट सायव्हर ब्रँट हीला गुजरात विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे. नॅटला बरं वाटत नसल्याने या सामन्यात खेळता येणार नाहीय. त्यामुळे नॅटच्या जागी हेली मॅथ्यूज हीचा समावेश करण्यात आल्याची माहिती कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टॉसनंतर दिली.

नॅटने दिल्ली विरूद्धच्या शेवटच्या सामन्यात ऑलराउंड कामगिरी करुन मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली होती. नॅटने त्या सामन्यात 70 धावा केल्या. त्यानंतर नॅटने 2 विकेट्सही मिळवल्या होत्या. आता नॅटच्या अनुपस्थितीत हेली कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गुजरातकडून 1 बदल

दरम्यान गुजरातलाही नाईलाजाने 1 बदल करावा लागला आहे. अनुष्का शर्मा हीच्या जागी आयुषी सोनी हीचा समावेश करण्यात आला आहे. आयुषीचं यासह पदार्पण झालं आहे. अनुष्काला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे.

गुजरात जायंट्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : बेथ मुनी (विकेटकीपर), सोफी डिव्हाईन, एश्ले गार्डनर (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, भारती फुलमाळी, आयुषी सोनी, कनिका आहुजा, काश्वी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका सिंग ठाकूर.

वूमन्स मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जी कामालीनि (विकेटकीपर), अमेलिया केर, निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, शबनिम इस्माईल आणि त्रिवेणी वसिष्ठा.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा