
आयपीएल 2025 नंतर मेजर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेला एकदम जोरात आणि दणक्यात सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडच्या फिन एलेन याने या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. फिन एलेन याने या स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक झळकावत धमाका केलाय. फिनने अवघ्या 34 चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकलं. फिनने यासह या शतकी खेळीत 13 षटकार आणि 3 चौकार लगावले. फिनने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 16 चेंडूत एकूण 90 रन्स केल्या. फिनने यासह टी 20 लीग क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी आणि रोहित शर्मा यांना पछाडलं. वैभव आणि रोहित या दोघांच्या नावावर 35 चेंडूत शतक करण्याचा विक्रम आहे. तसेच फिनने ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांचाही रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे.
एमएलसी स्पर्धेतील या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न टीमने वॉशिंग्टन फ्रीडमचा 123 धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. फिन एलेन याने केलेल्या 151 धावांच्या जोरावर सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न टीमने वॉशिंग्टन फ्रीडमसमोर 270 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वॉशिंग्टन फ्रीडमला 13.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 146 रन्सच करता आल्या. फिन एलेन सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्नच्या विजयाचा शिल्पकार ठरला. एलेन याने फक्त 51 बॉलमध्ये 296.08 च्या स्ट्राईक रेटने 151 रन्स केल्या. एलेनने या खेळीत 19 षटकार आणि 5 चौकार लगावले. फिनने या खेळीसह नक्की कोणत रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले? जाणून घेऊयात.
फिनने 34 चेंडूत शतक पूर्ण केलं. फिनने यासह वैभव सूर्यवंशी आणि रोहित शर्मा या दोघांना मागे टाकलं. वैभव आणि रोहित या दोघांनी 35 चेंडूत शतक झळकावलं होतं. तसेच फिनने या स्पर्धेत निकोलस पूरन याच्या नावावर असलेला सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडला. निकोलस पूरन याने 2023 साली 40 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. निकोलस पूरन एमएलसी स्पर्धेत यंदा मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कचं नेतृत्व करणार आहे.
फिन एलेनची तोडफोड खेळी, पूरनचा विक्रम उद्धवस्त
Finn Allen’s out here breaking records 💯 He smashed the fastest century in MLC history for the @SFOUnicorns! 🔥 pic.twitter.com/SVyQ9n99Rf
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 13, 2025
एलेनने 19 षटकारांसह ख्रिस गेल यालाही मागे टाकलं. एलेनने गेलचा एका टी 20 सामन्यात सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड ब्रेक केला. ख्रिस गेल याने 17 सिक्स लगावले होते. गेलने आयपीएलमध्ये ही कामगिरी केली होती.