Mohammed Shami | मोहम्मद शामी ते रवि शास्त्री कोणाकडून केलं हेअर ट्रान्सप्लांन्ट? भारतात इतक्या हजार कोटींचा व्यवसाय
Mohammed Shami | कुठल्याही व्यक्तीला त्याचे केस जास्त प्रिय असतात. कारण हा स्टाइलचा विषय आहे. कारण कोणालाही टक्कल नको असतं. क्रिकेटपटू मोहम्मद शमीने आपल्या गळणाऱ्या केसांवर उपचार केलेत. आता हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बनलाय.

अहमदाबाद : केस गळल्यामुळे टक्कल पडते. टक्कल हे शब्द ऐकूनच अनेकांच्या मनात धडकी भरते. कुठल्याही व्यक्तीला त्याचे केस प्रिय आहेत. म्हणून प्रत्येकजण केसांची निगा राखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतो. टक्कल पडल्यास आजच्या तारखेला त्यावर उत्तम पर्याय हेअर ट्रान्सप्लांटचा आहे. मोहम्मद शमी ते रवी शास्त्री या मोठ्या-मोठ्या क्रिकेटर्सनी याच हेअर ट्रान्सप्लांटचा आधार घेऊन आपलं व्यक्तीमत्व अधिक खुलवलं आहे. टक्कल पडण्यापासून मुक्ती हा आज भारतात मोठा व्यवसाय बनलाय. येणाऱ्या दिवसात हे 4,660 कोटी रुपयांच मार्केट बनू शकतं. भारतीयच नाही, अमेरिका, युरोपमधून नागरिक टक्कल पडण्यातून मुक्तता करण्यासाठी भारतात येत आहेत.
लोक आता हेअर ट्रान्सप्लांटचा आधार घेत आहेत. भारतात 2032 पर्यंत हा व्यवसाय वाढून 56 कोटी डॉलर म्हणजे 4,660 कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकतो. वर्ष 2022 मध्ये भारतात हेअर ट्रान्स प्लांन्टची मार्केट साइज 18 कोटी डॉलर म्हणजे 1500 कोटी रुपये होती. म्हणजे पुढच्या आठ वर्षाते हे मार्केट तीन पट वाढणार आहे.
हेअर ट्रान्सप्लांटचा व्यवसाय किती मोठा?
पीटीआयच्या वृत्तानुसार, हेअर ट्रान्सप्लांट सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. जशी-जशी या उद्योगाची लोकप्रियता वाढेल, तसा बिझनेसही वाढेल. वर्ल्ड फॉलिक्यूलर यूनिट एक्सट्रॅक्शन इंस्टिट्यूटचे सायंटिस्ट डायरेक्टर डॉ. प्रदीप सेठी यांच्या म्हणण्यानुसार, ग्लोबल लेव्हलवर सुद्धा हेअर ट्रान्सप्लांटचा व्यवसाय मोठा आहे. डॉ. प्रदीप सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमीपासून इंडियन क्रिकेट टीमचे फिजियोथेरेपिस्ट एंड्रयू लीपस, इंग्लंडचे क्रिकेटर निक कॉम्पटन, दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटर मोर्ने वान विक, रवी शास्त्री आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांनी त्यांच्याकडून हेअर ट्रान्सप्लांट करुन घेतलय.
परदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या किती ?
भारतात तुलनेने हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च कमी आहे. त्यामुळे आता हे मेडिकल टूरिजमचा भाग बनलय. अमेरिका, युरोपमधून लोक हेअर ट्रान्सप्लांटसाठी भारतात येत आहेत. माझ्याकडे दरवर्षी जितके रुग्ण येतात, त्यातले 40 टक्क्याहून अधिक रुग्ण अमेरिका, युरोपमधून येतात, असं डॉ. प्रदीप सेठी यांनी सांगितलं. सक्सेसफुल हेअर ट्रान्सप्लांटमध्ये दिल्ली-एनसीआर, जयपूर आणि मुंबई सर्वात पुढे आहे.
