AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Siraj याची ऐतिहासिक कामगिरी, श्रीलंका विरुद्ध महारेकॉर्ड

Mohammed Siraj | टीम इंडियाला सुपर 4 मॅचमध्ये श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागे याने फिरकीच्या जोरावर जेरीस आणलं होतं. आता मोहम्मद सिराजने 6 विकेट्स जशास तशी परतफेड केली आहे.

Mohammed Siraj याची ऐतिहासिक कामगिरी, श्रीलंका विरुद्ध महारेकॉर्ड
| Updated on: Sep 17, 2023 | 5:58 PM
Share

कोलंबो | टीम इंडियाचा मिया भाई अर्थात मोहम्मद सिराज याने श्रीलंका विरुद्ध आशिया कप 2023 फायनलमध्ये धमाका केला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जे कुणालाच जमलं नव्हतं ते एकट्या मोहम्मद सिराजने करुन दाखवलंय. सिराजने श्रीलंकेच्या गोलंदाजांना दे दणादण धक्के देत इतिहास रचला आहे. टॉस जिंकून मोठ्या आत्मविश्वासाने श्रीलंकेचे बॅट्समन मैदानात बॅटिंगसाठी आले. मात्र जसप्रीत बुमराह याच्या मदतीने मोहम्मद सिराज याने लंकादहन केलं.

जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का देत टीम इंडियाला शानदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर मोहम्मद सिराज बॉलिंग टाकायला आला. सिराजने या ओव्हरमध्ये पूर्ण मॅचच टीम इंडियाच्या बाजूने झुकवली. सोबत त्याने मोठा विक्रम केला. सिराजने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. सिराज यासह टीम इंडियाकडून एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला.  मोहम्मद सिराज याने एका ओव्हरमध्ये अनुक्रमे पाथुम निसांका, सदीरा समाराविक्रमा, चरीथ असलंका आणि धनंजया डी सिल्वा या चौघांना एकाच ओव्हरमध्ये गुंडाळलं.

मोहम्मद सिराज याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंका अवघ्या 15.2 ओव्हरमध्ये अवघ्या 50 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने अवघ्या 7 ओव्हरमध्ये 21 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. सिराजने या 7 पैकी 1 ओव्हर ही मेडन टाकली. तसेच उपकर्णधार हार्दिक पंड्या याने 3 विकेट्स घेतल्या. हार्दिकने दुनिथ वेल्लालागे, प्रमोद मधुशन आणि मथीशा पथीराणा या तिघांना आऊट केलं. तर जसप्रीत बुमराह याने 1 विकेट घेतली.

आशिया कप 2023 फायनलसाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली. केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

आशिया कप फायनलसाठी श्रीलंकेचे 11 शिलेदार | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.