IND vs ENG: मोहम्मद सिराज 23 विकेट्स घेण्यासाठी इतका किमी धावला? वाचून तुम्हाला बसेल धक्का
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपली असली तरी बातम्या काही संपत नाही. पाचव्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली आणि विजय मिळवून दिला. या मालिकेत त्याने एकूण 23 विकेट घेतल्या. पण यासाठी किमी धावला माहिती आहे का?

टीम इंडियाने पाच सामन्यांची कसोटी मालिका यशस्वीरित्या 2-2 ने बरोबरीत सोडवली. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. एकंदरीत संपूर्ण संघाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. बुमराहच्या गैरहजेरीत भारताने पाचवा कसोटी सामना जिंकला. या कसोटी सामन्यात भारतावर दडपण होतं. पण भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने ही भूमिका चोखपणे पार पाडली. मालिकेतील पाचही सामन्यात मोहम्मद सिराज खेळला. वर्कलोड मॅनेजमेंटचा काही प्रश्नच नव्हता. सर्व सामने खेळणाऱ्या टीम इंडियाच्या काही मोजक्या खेळाडूंपैकी सिराज हा एक आहे. वेगवान गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असलेल्या इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर सिराजने भेदक गोलंदाजी केली. संघाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा गोलंदाजी केली. सिराजने खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये एकूण 185.3 षटके टाकली. म्हणजेच 1113 चेंडू टाकले. पण यासाठी सिराज किती किमी धावला? माहिती आहे का? यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 185.3 षटके टाकली. याचा अर्थ असा की सिराजने 25 दिवसांत 1113 चेंडू टाकले. सिराजने इतके चेंडू टाकण्यासाठी 31 किमीपेक्षा जास्त धाव घेतली. आता जर आपण सिराजचा गोलंदाजीची रनअप 14 मीटर पकडली तर तर सिराजने प्रत्येक चेंडूसाठी 28 मीटर अंतर कापले. म्हणजेच तितकं लांब जाऊन गोलंदाजी करणे. आता जर सिराजने प्रत्येक चेंडूसाठी 28 मीटर धावला असेल तर 1113 चेंडू टाकण्यासाठी 31 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले.
मोहम्मद सिराज या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने एकूण 23 विकेट घेतल्या. पण यासाठी त्याने 31 किमीपेक्षा जास्त अंतर कापलं. हे तर फक्त गोलंदाजीचं झालं. या दरम्यान, सिराजने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही केलं. त्यामुळे त्याने या मालिकेत चांगलाच घाम गाळला हे स्पष्ट दिसत आहे. मोहम्मद सिराजची निवड आशिया कप 2025 स्पर्धेत होईल की नाही अजूनही गुलदस्त्यात आहे. पण त्यानंतर होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेत नक्कीच असेल. कारण सध्या कसोटीत त्याच्या गोलंदाजीची धार टीम इंडियाला महत्त्वाची आहे.
