AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघ सोडणार! नेमकं असं काय झालं की चर्चांना उधाण

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी ट्रेड विंडोचे दरवाजे खुले झाले आहेत. असं असताना संजू सॅमसनच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघ सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण असं का ते समजून घ्या.

| Updated on: Aug 08, 2025 | 2:50 PM
Share
आयपीएल 2026 अर्थात 19 व्या पर्वापूर्वी काही संघात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सध्या ट्रेड विंडोचा पर्याय खुला आहे. तर डिसेंबर जानेवारी महिन्यात मिनी लिलाव होऊ शकतो. तत्पूर्वी काही खेळाडूंची ट्रेड विंडोच्या माध्यमातून देवाणघेवाण होऊ शकते. (Photo- PTI)

1 / 7
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनबाबत चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्याबाबत चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेनुसार, संजू सॅमसन पुढील महिन्यात वेगळ्या फ्रेंचायझीकडून खेळताना दिसू शकतो. (Photo- PTI)

2 / 7
चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून दोन्ही संघात करार होण्याची  शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Photo- PTI)

3 / 7
क्रिकबझने संजू सॅमसनच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वृत्त दिले आहे की, संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसनने राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाला याबाबत औपचारिक माहिती दिली आहे. ट्रेड विंडो किंवा मिनी लिलावासाठी संघातून मुक्त होण्याची विनंती केली आहे. (Photo- PTI)

4 / 7
सोशल मीडियावर उडालेल्या अफवेनुसार, संजू सॅमसन आणि फ्रँचायझी व्यवस्थापनात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे संजू सॅमसनने संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. गेल्या पर्वात असं काही घटना घडल्या की त्यामुळे त्याची नाराजी आहे.  (Photo- PTI)

5 / 7
संजू सॅमसन गेल्या 8 पर्वापासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. संजूने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि सलग तीन हंगामात संघाकडून खेळला. त्यानंतर फ्रँचायझीवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. तेव्हा संजू 2016 आणि 2017 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला. (Photo- PTI)

6 / 7
राजस्थान रॉयल्स संघावरील बंदी उठवल्यानंतर संजू 2018 मध्ये पुन्हा संघात सामील झाला. तेव्हापासून संघाचा भाग असलेल्या संजूने 2021 मध्ये संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली. सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने 14 वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Photo- PTI)

7 / 7
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.