IND vs SL: बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराज ठरलाय ‘किंग’; आता लंकन फलंदाजांना नमवण्यासाठी सज्ज!

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कसोटीत फिरकीची जादू चालेल असं बोललं जात आहे. पण मोहम्मद सिराजही कमाल करू शकतो.

IND vs SL: बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराज ठरलाय किंग; आता लंकन फलंदाजांना नमवण्यासाठी सज्ज!
IND vs SL: बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराज ठरलाय 'किंग'; आता लंकन फलंदाजांना नमवण्यासाठी सज्ज!
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 13, 2026 | 4:42 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही मालिका श्रीलंकेत होत असल्याने फिरकीची कमाल असेल असं बोललं जात आहे. त्यामुळे श्रीलंकेने संघ निवडताना पाच फिरकीपटू निवडले आहेत. त्यामुळे फिरकी किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येतो. त्यात गॉल कसोटी सामन्यात फिरकीचा दबदबा असेल यात काही शंका नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना विकेटसाठी खूपच मेहनत घ्यावी लागेल असं दिसत आहे. पण असं असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आपली छाप टाकू शकतो. कारण एकीकडे श्रीलंकन संघ आहे आणि दुसरीकडे जसप्रीत बुमराहची गैरहजेरी.. आता हे काय समीकरण आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. पण आकडेवारी वाचल्यानंतर तुमच्या सर्व काही लक्षात येईल.

बुमराह नसताना सिराज अधिक घातक

कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेला मुकला. त्यामुळे त्याच्याशिवाय टीम इंडियाचं कसं होणार? असा प्रश्न आहे. बुमराह वेगवान गोलंदाजीला अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवरही आपली जादू दाखवण्यात सक्षम आहे. त्यामुळे त्याची गैरहजेरी टीम इंडियासाठी धक्काच आहे. पण त्याच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराजने चांगली कामगिरी केली आहे. बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराज टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज असेल. यापूर्वीही सिराजने ही जबाबदारी पार पाडली आहे. इंग्लंड दौऱ्यात शेवटच्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे बुमराह खेळला नव्हता. तेव्हा सिराजने गोलंदाजीची धुरा सांभाळत दोन्ही डावात एकूण 9 विकेट काढल्या होत्या.

मोहम्मद सिराजने 2021 ब्रिस्बेन कसोटीतही अशीच भूमिका बजावली आहे. टीम इंडियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. बुमराह आणि सिराज एकत्र 29 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात सिराजने 90 विकेट काढल्या आहे. तर 17 कसोटीत बुमराह नव्हता त्यात सिराजने 25.4 च्या सरासरीने 50 विकेट काढल्या आहेत. त्यामुळे बुमराहच्या गैरहजेरीत सिराज अधिक घातक ठरतो.

श्रीलंकेविरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड

मोहम्मद सिराज आणि श्रीलंकन यांचं एक वेगळंच गणित आहे. सिराज श्रीलंकेविरुद्ध कायम हुकूमाचा एक्का ठरला आहे. सिराजने 9 वनडे सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 14 सरासरीने 22 विकेट काढल्या आहेत. आता पहिल्यांचा कसोटीत श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. रेड बॉलने कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us