AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची तयारी ठेवा..! वनडे वर्ल्डकप 2027 नंतर नेमकं काय घडणार?

जसप्रीत बुमराह हे भारतीय वेगवान गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आहे. पण अस्त्र कोणत्या वेळी आणि कसं वापरायची याचा विचार करण्याची वेळ आहे. कारण दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहचं खेळणं कठीण झालं आहे. अशा स्थितीत आता त्याच्याशिवाय खेळण्याची तयारी केली जात आहे.

जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची तयारी ठेवा..! वनडे वर्ल्डकप 2027 नंतर नेमकं काय घडणार?
जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची तयारी ठेवा..! वनडे वर्ल्डकप 2027 नंतर नेमकं काय घडणार?Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 12, 2026 | 2:38 PM
Share

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज आणि मॅच विनर खेळाडू म्हणून ख्याती असलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला सध्या दुखापतीने ग्रासलं आहे. गेल्या काही वर्षात दुखापतीमुळे संघाच्या आत बाहेर राहिला आहे. आता श्रीलंका कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड केली होती. पण दुखापतीतून सावरला नसल्याने या मालिकेला मुकला आहे. त्याची रिप्लेसमेंट म्हणून बीसीसीआयने आकिब नबीची संघात निवड केली आहे. असं असताना जसप्रीत बुमराह आता कधी फिट अँड फाईन होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यात वनडे वर्ल्डकप 2027 नंतर जसप्रीत बुमराह फक्त टी20 सामने खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. कारण वारंवार होत असलेल्या दुखापतीमुळे मोठ्या फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी फिट दिसत नाही. त्यामुळे टीम इंडियाला आता मोठ्या फॉर्मेटमध्ये त्याच्याशिवाय खेळण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे.

जसप्रीत बुमराह 16 जुलैला इंग्लंडविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर त्याने एकही चेंडू टाकलेला नाही. कार्डिफ वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे लॉर्ड्स वनडे मालिकेला मुकला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सीओई श्रीलंका कसोटी मालिकेत बुमराहचा वर्कलोड वाढवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यासाठी त्याची तयारी झाली नाही. त्याला मोठ्या फॉर्मेटमध्ये दीर्घ काळ गोलंदाजी करून बराच अवधी लोटला आहे. सीओई त्याच्याबाबत जरा सतर्कच आहे. त्यामुळे बुमराहसाठी मैदानात परतण्याची कोणतीच घाई नाही. दुसरीकडे, भारतीय संघाला आता बुमराहशिवाय तयारी करावी लागेल. पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा पार पडल्यानंतर तसंच करावं लागण्याची शक्यता आहे.

आकाश दीपच्या फिटनेसचं काय?

वेगवान गोलंदाज आकाश दीप मागच्या सहा महिन्यांपासून क्रिकेटच्या कोणत्याच फॉर्मेट खेळला नाही. पाठदुखीच्या त्रासामुळे आयपीएल 2026 स्प्रधेला मुकला. इतकंच द्विपक्षीय मालिकेतही खेळला नाही. आकाश फेब्रुवारीमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर मैदानात काही दिसला नाही. आकाश दीपसाठी सीओईने खूप प्रयत्न केले. पण श्रीलंका मालिकेसाठी काही फिट होऊ शकलेला नाही. आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी फिट अँड फाईन होईल का? हा प्रश्न आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?