
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेसाठी कसोटी मालिका सुरु आहे. पर्वात भारताचा तिसरी कसोटी मालिका दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे ही मालिका काहीही करून जिंकणं भाग आहे. भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली तर गुणतालिकेत दुसरं स्थान गाठणार आहे. सध्या भारतीय संघ हा तिसऱ्या स्थानावर आहे. भारत दक्षिण अफ्रिका पहिला कसोटी सामना 14 नोव्हेबंरला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ कोलकात्यात पोहोचले असून कसून सराव सुरु आहे. या मालिकेपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आपलं मत व्यक्त केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी ही मालिका किती महत्त्वाची आहे याबाबत त्याने स्पष्ट मत मांडलं.
मोहम्मद सिराजसाठी सध्याचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पर्व चांगलं गेलं आहे. आतापर्यंत दोन कसोटी मालिकेत त्याने एकूण 33 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद सिराज स्टार स्पोर्ट्सशी चर्चा करताना म्हणाला की, ‘ही मालिका नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पर्वासाठी महत्त्वाची हे. खासकरून यासाठी की दक्षिण अफ्रिकेने जेतेपद मिळवलं आहे. भले त्यांनी पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. पण आम्ही चांगली कामगिरी करण्यास तयार आहोत. आम्ही एक सकारात्मक वातावरण तयार केलं आहे. इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकलो.’
मोहम्मद सिराजने पुढे सांगितलं की, ‘वैयक्तिकरित्य मी चांगल्या लयीत गोलंदाजी करत आहे आणि याचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे. मजबूत संघांचा सामना केल्याने सुधारणा करण्यासाठी क्षेत्रे ओळखण्यास मदत होते आणि मी या आव्हानासाठी खरोखर उत्साहित आहे.’ दक्षिण अफ्रिकन संघात भारतात खेळत असल्याने टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे. पण न्यूझीलंडविरुद्धचा मागचा अनुभव पाहता क्रीडाप्रेमींच्या मनात धाकधूक आहेच. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची गरज असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्यात दक्षिण अफ्रिकेने जेतेपद मिळवल्याने भारताला सहज विजय मिळवून देणार नाही यातही काही दुमत नाही.