मुकेश कुमारला जर्सीवरून भारतीय फॅन्सनी धरलं धारेवर, पण झालं असं काही

भारत अ संघ इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड लायन्सविरुद्ध मैत्रिपूर्ण कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यात भारतीय फॅन्सच्या रडारवर असलेल्या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली. नेमकं काय झालं वाचा

मुकेश कुमारला जर्सीवरून भारतीय फॅन्सनी धरलं धारेवर, पण झालं असं काही
मुकेश कुमारला जर्सीवरून भारतीय फॅन्सनी धरलं धारेवर
Image Credit source: Stu Forster/Getty Images
| Updated on: Jun 01, 2025 | 10:44 PM

भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात अनऑफिशियल कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत जबरदस्त कामगिरी केली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं. भारतीय गोलंदाजांनी 5 फलंदाजांना तंबूत पाठवलं आहे. या सामन्यात मुकेश कुमारने 18 क्रमांकाची जर्सी परिधान केल्याने वादाला फोडणी मिळाली होती. कारण आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 18 क्रमांकाची जर्सी ही विराट कोहली परिधान करत होता. पण आता त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यात मुकेश कुमार गोलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याने 18 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. पण या टीकेनंतरही मुकेश कुमार काही फरक पडला नाही. त्याने आपल्या कामगिरीने हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 557 धावा केल्या होत्या. यात करूण नायरच्या द्विशतकाचा समावेश आहे. इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांना पहिल यश 22 धावांवर मिळालं. पण त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठ खूपच संघर्ष करावा लागला. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी तीन विकेट घेतल्या आहेत. यात सर्वात मोठी विकेट ही मॅक्स होल्डेनची होती. होल्डेनने इंडिया ए विरुद्ध 101 धावांची खेळी केली होती. पण मुकेश कुमारने 4 धावांच्या आत दोन विकेट काढल्या आणि इंग्लंड लायन्सला बॅकफूटवर ढकललं. दरम्यान, मुकेश कुमारने भारतीय संघासाठी तीन कसोटी सामने खेळले आहेत. तसेच 7 विकेट घेतल्या आहेत.

मुकेश कुमार आणि 18 क्रमांची जर्सी

मुकेश कुमार इंग्लंड लायन्सविरुद्ध गोलंदाजीसाठी उतरला तेव्हा 18 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर वादाला फोडणी मिळाली होती. विराट कोहलीच्या चाहत्यांनी तर त्याला धारेवर धरलं होतं. कारण 18 क्रमांकाचं विराट कोहलीशी एक नातं आहे. विराट कोहलीने टी20 आणि कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पण वनडेत क्रिकेटमध्ये अजूनही कायम आहे. त्यामुळे ही जर्सी रिटायर करता येत नाही. अशा स्थितीत ही जर्सी परिधान केल्याने चाहत्यांचा भावना दुखावल्या. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात 18 ऑगस्टला केली होती. तर त्याच्या वडिलांचं निधन 18 डिसेंबर 2006 रोजी झालं होतं. त्यामुळे या क्रमांकाचं आणि त्याचं वेगळं नातं आहे.