Mumbai Indians च्या मॅचमध्ये फुलली Sweet लव्हस्टोरी, डायरेक्ट Live Match मध्ये प्रपोज, पहा VIDEO

मुंबई आणि चेन्नई परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी दोन्ही टीम्समध्ये सामना रंगलेला असताना एका क्रिकेट फॅननं आपल्या गर्लफ्रेंडला हजारो लोकांच्या समोरच प्रपोज केलंय.

Mumbai Indians च्या मॅचमध्ये फुलली Sweet लव्हस्टोरी, डायरेक्ट Live Match मध्ये प्रपोज, पहा VIDEO
IPL Match Image Credit source: social media
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 1:53 PM

मुंबई: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम आजही तसंच सेम आहे. पण ते व्यक्त करण्याची पद्धत, तऱ्हा मात्र बदलत चालली आहे. आधी हॉटेलमध्ये, समुद्र किनाऱ्यावर, गार्डनमध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त केलं जायचं. पण आता प्रेम व्यक्त करण्याचं ठिकाण बदललं आहे. सध्या भारतात इंडियन प्रिमीयर लीगचा (IPL) मोसम सुरु आहे. आजच्या पिढीतल्या तरुण-तरुणींनी प्रेम व्यक्त करण्यासाठी आयपीएलची निवड केली आहे. भारतात क्रिकेटची क्रेझ अबालवृद्ध सर्वांमध्येच आहे. तरुणी सुद्धा यामध्ये मागे नाहीत. अनेक तरुण-तरुणी सामना पहायला स्टेडिमयवर जातात. तिथेच आपलं प्रेमही (IPL love Story) व्यक्त करतात. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. मुंबई इंडीयन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या (MI vs CSK) सामन्या दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातय.

आनंद आणि सुवर्णाची एंगेजमेंट

मुंबई आणि चेन्नई परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी दोन्ही टीम्समध्ये सामना रंगलेला असताना एका क्रिकेट फॅननं आपल्या गर्लफ्रेंडला हजारो लोकांच्या समोरच प्रपोज केलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ या सीजनमधला आहे की, याआधीच त्याबद्दल कुठलीही स्पष्टता नाहीय. व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या जोडप्याचं नाव आनंद आणि सुवर्णा आहे. त्यांनी एंगेजमेंट केल्याचही सांगितलं जातय.

RCB च्या फॅनवर एका मुलीचा जीव जडला

यंदाच्या आयपीएलमध्ये स्टेडियमवर प्रपोज करण्याची घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्या दरम्यान एका मुलीने मुलाला प्रपोज केलं होतं. सामना सुरु होता. निकाल लागला नव्हता. त्याचवेळी पुण्यातील स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या RCB च्या फॅनवर एका मुलीचा जीव जडला. तिने गुडघ्यावर बसून आपल्या प्रेमाची कबुली दिली. खरंतर मुलं जास्तवेळा गुडघ्यावर बसून प्रपोज करतात. पण इथे उलट घडलं. RCB फॅनसाठी मुलीनेच गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. LIVE मॅचमध्ये म्हणजे एका सामन्यात हे सर्व घडलेलं नाही. बऱ्याच आधीपासून हे सर्व सुरु असणार. फक्त चेन्नई आणि बँगलोरच्या सामन्यादरम्यान हे प्रेम व्यक्त झालं.

हे सुद्धा वाचा

कपलच किसींग सीन

याच सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्समधील लढत सुद्धा अशाच एका कारणासाठी चर्चेत आली होती. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षक गॅलरीत बसलेले एक कपल किसींग करताना दिसले होते. उपस्थित कॅमेरामनने लगेच तो फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल व्हायला फार वेळ लागला नाही. नेटीझन्सनी लगेच या फोटोवर आपली क्रिएटीव्हीटी दाखवली. सोशल मीडियावर गमतीशीर मीम्सचा जणू पूरच आला होता.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.