IPL 2022: Mumbai Indians ने आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखण्यात चूक कशी केली? याला जबाबदार कोण?

IPL 2022 चा सीजन Mumbai Indians साठी एका वाईट स्वप्नासारखा आहे. फ्रेंचायजीसह मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनाही हा सीजन स्मरणात ठेवायची इच्छा नसेल.

May 18, 2022 | 2:10 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 18, 2022 | 2:10 PM

IPL 2022 चा सीजन Mumbai Indians साठी एका वाईट स्वप्नासारखा आहे. फ्रेंचायजीसह मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनाही हा सीजन स्मरणात ठेवायची इच्छा नसेल. मुंबई इंडियन्सचा कालही सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध 3 धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा हा 10 वा पराभव आहे.

1 / 10
यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ तळाला रहाणार हे स्पष्ट आहे. सर्वप्रथम मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फ्लॉप झाली. त्यानंतर त्यांचे सिनियर फलंदाजही जबाबदारीने खेळू शकले नाहीत. सर्वाताआधी टॅलेंट ओळखणाऱ्या संघाची या सीजनमध्ये खूप खराब स्थिती आहे.

2 / 10
मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये माहेला जयवर्धन, झहीर खान सारखे दिग्गज आहेत. सचिन तेंडुलकर मेंटॉर म्हणून संघासोबत आहे. रॉबिन सिंहच्या अनुभवाची सुद्धा संघाला साथ मिळतेय. रोहित शर्मा सारखा कॅप्टन या संघाकडे आहे.

3 / 10
एवढ्या सगळ्या दिग्गजांची फौज असूनही मुंबई इंडियन्स आपल्या सर्वात मोठ्या मॅचविनरला ओळखू शकली नाही. याच सर्वात जास्त वाईट वाटतं.

4 / 10
टिम डेविडला 6 सामने बेंचवर बसवून ठेवलं. त्यानंतर तो मैदानात परतला. पुनरागमन केल्यानंतर त्याने प्रत्येक सामन्यात स्वत:ला सिद्ध केलं आहे.

5 / 10
टिम डेविड सारख्या खेळाडूला 6 सामने बेंचवर बसवून ठेवणं ही आपली सर्वात मोठी चूक होती. हे आता त्या संघातल्या सपोर्ट स्टाफमधल्या सदस्यांनाही वाटत असेल.

6 / 10
टिम डेविडकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. एक कायरन पोलार्ड रिटायर झाला. पण दुसरा मुंबई इंडियन्सला मिळाला, असं आपण म्हणू शकतो.

7 / 10
काल याच डेविडमुळे मुंबई जिंकण्याच्या स्थितीमध्ये पोहोचली होती. टिम डेविडने 18 चेंडूत 46 धावा चोपल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार होते.

8 / 10
टी. नटराजन सारख्या टॉप बॉलरच्या एक ओव्हरमध्ये टिम डेविडने चार सिक्स ठोकले. ही साधीसुधी गोष्ट नाहीय. आयपीएलमधल्या सर्वोत्तम डेथ बॉलर्सपैकी तो एक आहे.

9 / 10
डेविड काल रनआऊट झाला नसता, आणखी आणखी आठ चेंडू खेळपट्टीवर टिकला असता, तर सामन्याचा निकाल आज वेगळा असता.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें