IPL 2026 : मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी विजय आयपीएलसाठी डोकेदुखी, कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धेतील तीन सामन्यांचा खेळ संपला असून ही स्पर्धा पुढे सरकत आहे. पहिल्या तीन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी विजय मिळवला. पण या तीन संघांचा विजय आयपीएलसाठी योग्य नाही. असं का ते जाणून घेऊयात.

IPL 2026 : मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी विजय आयपीएलसाठी डोकेदुखी, कारण की...
IPL 2026 : मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी विजय आयपीएलसाठी डोकेदुखी, कारण की...
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 31, 2026 | 2:59 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगला. या तीन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला. या तिन्ही संघांचा विजयात फार काही बदललं नाही. विजयाचा पॅटर्न आयपीएलच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं दिसत आहे. या तीन संघाच्या विजयाने आयपीएल कशी काय अडचणीत येऊ शकतो. कोणत्याही संघासाठी विजय चांगलाच असतो. पण आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा सारखेपणा आहे, तो आयपीएलसाठी घातक ठरणारा आहे. कसं काय ते समजून घेऊयात.

आरसीबी विरुद्ध हैदराबाद सामन्यात काय घडलं?

आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा आरसीबीच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने पहिल्या डावात 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे आव्हान आरसीबीने 15.4 षटकात पूर्ण करत एक विक्रम रचला. आरसीबीने 26 चेंडू आणि 6 गडी राखून एकहाती विजय मिळवला.

मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर सामना

मुंबई आणि कोलकात्याचा संघ दुसऱ्या सामन्यात समोरासमोर उभे ठाकले होते. या सामन्यात मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 220 धावा केल्या आणि 221 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान सहज गाठलं. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजय मिळवला.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

आयपीएलमधील तिसरा सामा राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थानने कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करत 127 धावा केल्या. हा सामना राजस्थानने 47 चेंडू राखून पूर्ण केला.

आयपीएलसाठी अडचणीचं काय ठरणार?

आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात एक साम्य होतं. पहिलं म्हणजे नाणेफेक जिंकणारा संघच सामना जिंकला. दुसरं म्हणजे तिन्ही सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग झाला. तिसरं म्हणजे तिन्ही सामन्यात सहज विजय मिळवला. या तीन गोष्टी आयपीएलसाठी त्रासदायक आहेत. कारण क्रिकेट चाहत्यांना अशा पद्धतीने विजयाचा कंटाळा येऊ शकतो. सामने एकतर्फी आणि रटाळ वाटतील. यामुळे लोकप्रियता कमी होऊ शकतो.

 

Follow Us