AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 मध्ये फ्लॉप शो, Mumbai Indians चा मोठा निर्णय, हेड कोचने सोडलं पद

मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या टीमचा विस्तार सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजींनी अन्य देशातील लीगमध्ये टीम्स विकत घेतल्या आहेत.

IPL 2022 मध्ये फ्लॉप शो, Mumbai Indians चा मोठा निर्णय, हेड कोचने सोडलं पद
Mumbai indians Image Credit source: instagram
| Updated on: Sep 14, 2022 | 2:05 PM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या टीमचा विस्तार सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजींनी अन्य देशातील लीगमध्ये टीम्स विकत घेतल्या आहेत. त्यामुळे कोचिंग स्टाफच्या जबाबदारीत काही बदल केले आहेत. माहेला जयवर्धने आणि झहीर खान या दोघांना आणखी मोठी भूमिका दिली आहे. माहेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचे हेड कोच होते.

झहीर खानकडे नवीन जबाबदारी

आता जयवर्धने यांच्याकडे परफॉर्मन्स ग्लोबल हेड म्हणून जबाबदारी असणार आहे. झहीर खान क्रिकेट डेव्हलपमेंट हेड असणार आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलसाठी नवीन हेड कोच जाहीर करणार आहे. 2017 पासून माहेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचे हेड कोच होते.

नव्या टीम्सचा हा पहिलाच सीजन

मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजींनी दुबईत ILT20 मध्ये आणि SA20 मुंबई इंडियन्स केप टाऊनमध्ये टीम विकत घेतली आहे. मुंबई इंडियन्सच्या या दोन्ही नव्या टीम्सचा हा पहिलाच सीजन असणार आहे. यूएई आणि दक्षिण आफ्रिकेत ही लीग होणार आहे.

नव्या रोलमध्ये जयवर्धने प्रचंड व्यस्त असतील

इएसपीए क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सच्या हेड कोच पदावर नवीन नियुक्ती लवकरच जाहीर केली जाईल. नव्या रोलमध्ये जयवर्धने प्रचंड व्यस्त असतील. त्यांच्याकडे वेगवेगळ्या टीम्सची जबाबदारी असणार आहे. त्यांना संपूर्ण कोचिंग स्टाफावर लक्ष ठेवावं लागेल. खेळाडूंची निवड आणि रणनितीक प्लानिंगमध्ये महत्त्वाचा रोल असेल. वेगवेगळ्या लीगमधील टीमला यश मिळवून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावर असेल.

माहेला जयवर्धने म्हणाले….

“मुंबई इंडियन्सच्या ग्लोबल क्रिकेट ऑपरेशन्सच नेतृत्व करायला मिळणं, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मुंबई इंडियन्सचा जागतिक स्तरावर विकास होताना पाहणं, ही आनंदाची बाब आहे” असं जयवर्धने म्हणाले. वेगवेगळ्या देशांमधील क्रिकेट टॅलेंट शोधणं, खेळाडूंचा विकास ही झहीर खानवर जबाबदारी असेल.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती