AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC : अखेर प्रतिक्षा संपली! 23 फेब्रुवारीपासून नव्या हंगामाला सुरुवात, पहिलाच सामना मुंबई इंडियन्सचा

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्याच्या माध्यमातून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 23 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरु होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघ यंदाही जेतेपदासाठी तगडा दावेदार मानला जात आहे. चला जाणून घेऊयात प्लेइंग इलेव्हन आणि दिल्ली कॅपिटल्स संघांबाबत

MI vs DC : अखेर प्रतिक्षा संपली! 23 फेब्रुवारीपासून नव्या हंगामाला सुरुवात, पहिलाच सामना मुंबई इंडियन्सचा
MI vs DC : बिगुल वाजलं!दोन दिवसांनी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स येणार आमनेसामने, अशी असेल प्लेइंग इलेव्हन
| Updated on: Feb 20, 2024 | 3:34 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून असलेली प्रतीक्षा आता संपली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या ऑक्शननंतर पाच संघ स्पर्धेसाठी सज्ज झाले होते. अखेर वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेची उत्सुकता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिलं पर्व मुंबई इंडियन्सने जिंकलं होतं. यंदाही जेतेपदावर नाव कोरण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज आहे. पहिल्या पर्वापेक्षा यंदाच्या स्पर्धेत जोरदार चुरस पाहायला मिळेल अशी चर्चा आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला सामना शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. डब्ल्यूपीएल 2024 च्या पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 च्या विविध चॅनेलवर आणि कलर्स सिनेप्लेक्सवर देखील पाहता येईल. तर जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर पूर्णपणे विनामूल्य पाहता येईल.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने गेल्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं होतं. तसेच जेतेपदावर नाव कोरलं होतं. मुंबई इंडियन्सने 8 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिली होती. पण डिसेंबर महिन्यात झालेल्या लिलावत मुंबईने हीदर ग्राहम, धरा गुज्जर, सोनम यादव आणि नीलम बीष्ट यांना रिलीज केलं होतं. तसेच 13 खेळाडूंना रिटेन केलं होतं. तसेच शबनिम इस्माईसाठी 1.20 कोटी मोजले. तसेच सजीवन संजना, अमनदीप कौर, कीर्तन बालाकृष्णन आणि फातिमा जाफरला संघात सहभागी करून घेतलं.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिझान कॅप, एलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे, मिन्नू मणी, अरुंधती रेड्डी.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन संजना, पूजा वस्त्राकर, साइका इशाक, शबनिम इस्माईल, जिंतिमणी कलिता

दोन्ही संघाचे खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स – जेमिमाह रोड्रिग्स, लॉरा हॅरिस, मेग लॅनिंग, शफाली वर्मा, स्नेहा दीप्ति, एलिस कॅप्सी, एनाबेल सदरलँड, अरुंधति रेड्डी, जेस जोनासेन, अश्वनी कुमारी, अपर्णा मंडल, तानिया भाटिया, पूनम यादव, तितास साधु

मुंबई इंडियन्स – अमनजोत कौर, अमेलिया केर, अमनदीप कौर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेले मॅथ्यूज, हुमैरा काजी, इस्सी वोंग, जिंतिमनी कलिता, कीर्तन बालाकृष्णन, नट साइवर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, सजीवन संजना, प्रियंका बाला, यास्तिका भाटिया, फातिमा जाफर, साइका इशाक, शबनिम इस्माइल

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.