MI vs RCB Live Score Updates, IPL 2026: मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-रिकेल्टन मैदानात, मुंबईसमोर 241 रन्सचं टार्गेट
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Indian Premier League 2026 Live Score: मुंबई इंडियन्ससमोर घरच्या मैदानात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-रिकेल्टन मैदानात, मुंबईसमोर 241 रन्सचं टार्गेट
मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुुरुवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. आरसीबीने मुंबईसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : आरसीबीच्या वानखेडेत 240 धावा, मुंबई इंडियन्स जिंकणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 240 रन्स केल्या आहेत. आरसीबीसाठी फिलीप सॉल्ट, विराट कोहली आणि कॅप्टन रजत पाटीदार या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर कॅमरुन ग्रीन याने 34 रन्स करत फिनिशिंग टच दिला. आता मुंबई 241 रन्स करत विजय मिळवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : जितेश शर्मा आऊट, आरसीबीला चौथा झटका
ट्रेन्ट बोल्ट याने जितेश शर्मा याला एलबीडब्ल्यू आऊट करत आरसीबीला चौथा झटका दिला आहे. जितेशने 10 रन्स केल्या. बोल्टची ही या सामन्यातील आणि मोसमातील पहिली विकेट ठरली.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : आरसीबीच्या 19 ओव्हरमध्ये 230 धावा, गतविजेता 6 चेंडूत किती रन्स करणार?
आरसीबीच्या 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 230 धावा केल्या आहेत. टीम डेव्हीड 26 आणि जितेश शर्मा 10 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे जितेश-टीम जोडी शेवटच्या 6 चेंडूत किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : रजत पाटीदारच्या वादळी खेळीचा शेवट, आरसीबीला तिसरा झटका
मिचेल सँटनर याने आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याला आऊट केलं आहे. रजत पाटीदार याने 20 बॉलमध्ये 53 रन्स केल्या. रजतने या खेळीत 5 सिक्स आणि 4 फोर लगावले.
-
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : विराट कोहली अर्धशतकानंतर आऊट, आरसीबीला दुसरा झटका
हार्दिक पंड्या याने विराट कोहली याला आऊट करत आपली पहिली विकेट मिळवली आहे. आरसीबी विराटच्या रुपात दुसरी विकेट गमावली. विराटने 38 चेंडूत 50 धावा केल्या.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : कॅप्टन रजत पाटीदारची आक्रमक सुरुवात, आरसीबी द्विशतकाच्या दिशेने
आरसीबीने फिल सॉल्ट याच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन रजत पाटीदार याने विराटसोबत तडाखेदार बॅटिंग केली. रजतने यासह विराटसह आरसीबीला 14 ओव्हरमध्ये 183 धावांपर्यंत पोहचवलं आहे. रजतने 13 बॉलमध्ये 46 रन्स केल्या आहेत. तर विराट 35 बॉलमध्ये 49 रन्सवर खेळत आहे.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : ‘लॉर्ड’ ठाकुरकडून फिल सॉल्टचा गेम, आरसीबीला पहलिा झटका
शार्दुल ठाकुर याने मुंबईचया पहिल्या विकेटची प्रतिक्षा संपवली आहे. शार्दुलने फिल सॉल्ट याला आऊट करत आरसीबीला पहिला झटका दिला आहे. सॉल्टने 36 बॉलमध्ये 78 रन्स केल्या.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : विराट-सॉल्ट जोडीचा धमाका, पलटण विरुद्ध शतकी भागीदारी
विराट कोहली आणि फिल सॉल्ट या सलामी जोडीने आरसीबीसाठी शतकी भागीदारी केली आहे. विराटने मिचेल सँटनर याने टाकलेल्या नवव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर फोर ठोकला. यासह आरसीबीच्या सलामी जोडीने 100 धावांची भागीदारी केली. तर दुसऱ्या बाजूला मुंबई अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहे.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : सॉल्टचा धुमधडाका, मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई, ओपनर शतकाच्या दिशेने
फिल सॉल्ट याने मुंबई विरुद्ध तडाखेदार सुरुवात केली आहे. सॉल्टने विराट कोहली याच्यासह 8 ओव्हरमध्ये 95 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली आहे. सॉल्ट 29 बॉलमध्ये 68 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. त्यामुळे सॉल्ट असाच खेळत राहिला तर तो सहज शतक करेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर दुसऱ्या बाजूला विराटने 19 चेंडूत 25 रन्स केल्या आहेत.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : आरसीबीच्या नावावर पावरप्ले, सलामी जोडीचा धमाका, पलटण विरुद्ध किती धावा?
फिल सॉल्ट आणि विराट कोहली या सलामी जोडीने पावरप्ले आपल्या नावावर केला. सलामी जोडीने 6 ओव्हरमध्ये 70 रन्स केल्या. विराटने 14 चेंडूत 22 तर सॉल्टने 22 चेंडूत 47 धावा जोडल्या. तर मुंबईचे फलंदाज पावरप्लेमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरले.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : विराट-सॉल्टची जबरदस्त सुरुवात, पलटण पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत
विराट कोहली आणि फिल सॉल्ट या सलामी जोडीने आरसीबीला जबरदस्त सुरुवात करुन दिली आहे. या दोघांनी आरसीबीसाठी 5 ओव्हरमध्ये 65 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. विराट कोहली 20 आणि फिल सॉल्ट 44 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
MI vs RCB Live Score Updates IPL 2026 : सामन्याला सुरुवात, आरसीबीची बॅटिंग, विराट-सॉल्ट मैदानात
मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि ट्रेन्ट बोल्ट सलामी जोडी मैदानात आली आहे. सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सामन्याआधी श्रद्धांजली
मुंबई-आरसीबी सामना सुरु होण्याआधी स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंसह उपस्थित क्रिकेट चाहत्यांकडून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आशा भोसले यांचं आज रविवारी मुंबईत वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 शिलेदार :
मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 शिलेदार : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे आणि जसप्रीत बुमराह.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : आरसीबी प्लेइंग ईलेव्हन
आरसीबी प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), टीम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी आणि सुयश शर्मा.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबईने टॉस जिंकला, पलटणचा बॉलिंग करण्याचा निर्णय
मुंबई इंडियन्सच्या बाजूने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात नाणेेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने गतविजेत्या आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्सं बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : हेड टु हेड रेकॉर्ड्स
उभयसंघात आतापर्यंत एकूण 34 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने त्यापैकी 19 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 15 वेळा मुंबईवर विजय मिळवला आहे.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन
मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रियान रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकटेकीपर) फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जोश हेझलवुड, वेंकटेश अय्यर, सुयश शर्मा, जेकब बेथेल, रसिक सलाम दार, कनिष्क चौहान, जेकब डफी, मंगेश यादव, स्वप्नील सिंग, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा आणि सात्विक देसवाल.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबई इंडियन्स टीम
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गझनफर, जसप्रीत बुमराह, शेर्फेन रदरफोर्ड, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंझ, राज बावा, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक, विल जॅक्स, मयंक रावत, रघु शर्मा, अथर्व अंकोलेकर, दानिश मलेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
-
MI vs RCB Live Updates IPL 2026 : मुंबई-आरसीबी कडवी झुंज, कोण जिंकणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात क्रिकेट चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील चौथा सामना असणार आहे. मुंबईने 3 पैकी 1 तर आरसीबीने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमावला आहे. अशात कोणता संघ विजय मिळवून कमबॅक करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात मुंबई इंडियन्ससमोर त्यांच्या मोहिमेतील चौथ्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान आहे. आरसीबीचाही हा या मोसमातील चौथा सामना आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. मुंबईने घरच्याच मैदानात 2012 नंतर यंदा पहिल्यांदा सामना जिंकून मोहिमेची विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतर मुंबईला सलग 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. तर आरसीबीला सलग 2 विजयानंतर पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता दोन्ही संघांचा या सामन्यातून विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.