Murali Vijay : Live मॅचमध्ये दिनेश कार्तिकचं नाव घेत होता… मुरली विजयनची प्रेक्षकाला मारहाण, पाहा व्हिडीओ

काही वेळ शांत राहून चाहत्यांना असं न करण्यास मुरली विजयनं सांगितलं. पण, काही वेळानं तो स्टँडमध्ये घुसला आणि चाहत्यांशी हुज्जत घातली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Murali Vijay : Live मॅचमध्ये दिनेश कार्तिकचं नाव घेत होता... मुरली विजयनची प्रेक्षकाला मारहाण, पाहा व्हिडीओ
Murali Vijay
Image Credit source: social
| Updated on: Jul 28, 2022 | 7:50 AM

नवी दिल्ली : तामिळनाडू प्रीमियर लीग 2022चे (Tamilnadu Premier League 2022) पहिले आणि दुसरे क्वालिफायर सामने 29 जुलै रोजी खेळवले जातील. क्वालिफायर 1 मध्ये नेल्लई रॉयल किंग्ज चेपॉक सुपर जाइल्सशी भिडतील. क्वालिफायर 1 गमावलेल्या संघाचा क्वालिफायर 2 मध्ये लायका कोवाई किंग्सचा सामना होईल. ज्यानं एलिमिनेटरमध्ये मदुराई पँथर्सचा (Madurai Panthers) पराभव केला. पँथर्सनं त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात रुबी त्रिची वॉरियर्सचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 137 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना वॉरियर्सचा डाव 100 धावांवर आटोपला. वॉरियर्ससाठी हा अत्यंत निराशाजनक मोसम होता.  7 सामन्यांमध्ये वॉरियर्सने केवळ 2 सामने जिंकले होते. या पराभवाबरोबरच वॉरियर्स संघानं खेळाडूंच्या चाहत्यांशी झालेल्या बाचाबाचीमुळेही चर्चेत आली. खरं तर, मुरली विजय (Murali Vijay) पँथर्सविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता, पण तो पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता.

सामन्यादरम्यान मुरली विजय सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांनी दिनेश कार्तिकचे नाव घेऊन त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. खरंतर, मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्यातील संबंध बऱ्याच दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चांगले चालले नाहीत. काही दिवसांपूर्वी मुरली विजयला दिनेश कार्तिकचे नाव घेऊन अशाच प्रकारे चिडवले जात होते. मात्र, त्यावेळी त्यानं शांततेनं हात जोडून शांत राहण्याचं आवाहन केलं होतं.

पाहा व्हिडीओ

स्टँडमध्ये घुसला…

काही वेळ शांत राहून चाहत्यांना असं न करण्यास मुरली विजयनं सांगितलं, पण काही वेळानं तो स्टँडमध्ये घुसला आणि चाहत्यांशी हुज्जत घातली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, ही झुंज फार काळ टिकली नाही आणि मुरली विजय आणि एका चाहत्याला वेगळे करण्यासाठी प्रेक्षक पुढे आले. मुरली विजय तब्बल 21 महिन्यांनंतर मैदानात परतला. तो खासगी सुट्टीवर होता. मुरली विजयला अपेक्षेनुसार मोसमाची सुरुवात करता आली नाही. पण तो लवकरच लयीत आला आणि त्याने 4 सामन्यात 56 च्या सरासरीने 224 धावा केल्या. नेल्लई रॉयल किंग्जविरुद्ध त्याने 121 धावांची खेळी खेळली.

केवळ 2 सामने जिंकले

पँथर्सनं त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात रुबी त्रिची वॉरियर्सचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 137 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना वॉरियर्सचा डाव 100 धावांवर आटोपला. वॉरियर्ससाठी हा अत्यंत निराशाजनक मोसम होता.  7 सामन्यांमध्ये वॉरियर्सने केवळ 2 सामने त्यांनी जिंकले होते.