AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Break Pakistan World Records : भारतानं इतिहास रचला, पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला, एकदिवसीय मालिकेत पाकला मागे टाकलं, जाणून घ्या…

India Break Pakistan World Records : भारतानं डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर 119 धावांनी विजय मिळवत मालिका 3-0 ने क्लीन स्वीप केली. दरम्यान, भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विश्वविक्रमही मोडीत काढला.

India Break Pakistan World Records : भारतानं इतिहास रचला, पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला, एकदिवसीय मालिकेत पाकला मागे टाकलं, जाणून घ्या...
भारतानं पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडलाImage Credit source: twitter
| Updated on: Jul 28, 2022 | 10:13 AM
Share

नवी दिल्ली : भारतानं काल वेस्ट इंडिजचा (Ind vs WI)  पराभव करत मोठा विजय मिळवला. भारतीय संघानं तिसरा एकदिवसीय सामना  डकवर्थ लुईस नियमानुसार 119 धावांनी जिंकला. आणि यासह एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली. तिसऱ्या वनडेत धवन, चहल आणि गिल यांची भूमिका भारतासाठी महत्त्वाची होती. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या (3rd ODI) आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा त्यांच्याच भूमीवर पराजय झाला. वेस्ट इंडिजच्या भूमीवर प्रथमच वनडे मालिकेतील सर्व सामने जिंकण्यात टीम इंडियाला यश आले. या ऐतिहासिक मालिका विजयात शुभमन गिलनं (Shubman Gill) महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं नाबाद 98 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय 4 खेळाडूंचा विजयात महत्त्वाचा वाटा होता. दरम्यान, भारतानं पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडीत काढलाय. याविषयी अधिक जाणून घ्या…

आयसीसीचं ट्विट

इतिहास रचला

भारतीय संघाने अखेर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये इतिहास रचला. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजचा 119 धावांनी पराभव केला. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विश्वविक्रमही मोडीत काढला. भारतीय संघानं 2007 नंतर 12व्यांदा द्विपक्षीय वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला.

बीसीसीआयचं ट्विट

137 धावांत सर्वबाद

पावसामुळे अडचणीत सापडलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर 119 धावांनी विजय मिळवत मालिका 3-0 ने क्लीन स्वीप केली. भारताच्या डावातील 24 षटके पूर्ण झाल्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि सामना 40 षटकांचा करण्यात आला. दुसऱ्यांदा भारतीय डावाची 36 षटके पूर्ण झाल्यानंतर पावसानं हजेरी लावली आणि पाहुण्या संघाचा डाव तीन विकेट्सवर 225 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीनं वेस्ट इंडिजला 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य मिळाले. कॅरेबियन संघ अवघ्या 137 धावांत सर्वबाद झाला.

शुभमन गिल जोरात

सलामीवीर शुभमन गिलने 98 चेंडूत दोन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीनं नाबाद 98 धावा केल्या. गिलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही सर्वात मोठी खेळी होती. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 91 धावा केल्या होत्या. गिलनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात 64 धावा, दुसऱ्या वनडेत 43 धावा केल्या. त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शुभमन गिलनं शिखर धवन (58) सोबत पहिल्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. शिखर धवननं वनडे कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक झळकावलं. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. अशाप्रकारे त्याच्या एकदिवसीय सामन्यात 800 चौकार पूर्ण झाले आहेत. अशी कामगिरी करणारा तो 9वा भारतीय ठरला आहे. या डावात वेस्ट इंडिजविरुद्ध 1000 धावा पूर्ण करणारा धवन जगातील 22 वा फलंदाज ठरला.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....