
दक्षिण आफ्रिका आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत उलटफेरच्या हॅट्रिकपासून थोडक्यात बचावली. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सवर कसाबसा 4 विकेट्सने विजय मिळवला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 104 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेला या विजयी धावा पूर्ण करण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागला. काही वेळेसाठी नेदरलँड्स पुन्हा दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन सलग तिसऱ्यांदा उलटफेर करते की काय असं वाटत होतं. मात्र डेव्हिड मिलरने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेला सुरक्षितरित्या विजयी केलं. मिलरच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवता आला. तर नेदरलँड्सने 104 धावांचा बचाव करण्यासाठी जोरदार लढा दिला. मात्र दक्षिण आफ्रिका यशस्वी ठरली.
दक्षिण आफ्रिकेची 104 धावांचा पाठलाग करताना पहिल्या बॉलपासून विकेट गमावण्याने सुरुवात झाली. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 12 धावांवर 4 झटके देत बॅकफुटवर ढकललं. क्विंटन डी कॉक 0, रिझा हेंड्रिक्स 3, कॅप्टन एडन मारक्रम 0 आणि हेन्रिक क्लासेन 4 अशा धावा करुन आऊट झाले. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला 33 धावा करुन मैदानाबाहेर जावं लागलं. मार्को जान्सेन हा देखील 3 धावा करुन मैदानाबाहेर परतला. मात्र टीम अडचणीत असताना डेव्हिड मिलर संकटमोचक ठरला आणि दक्षिण आफ्रिलकेला विजयी केलं. मिलरने केशव महाराजला हाताशी घेत 18 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजय निश्चि करुन दिला.
डेव्हिड मिलरने 51 बॉलमध्ये 3 चौकार आणि 4 षटाकारांच्या मदतने 59 धावांची नाबाद खेळी केली. तर केशव महाराज खात न उघडता नाबाद परतला. नेदरलँड्सकडून लोगान वान बीक आणि व्हीव्हीयन किंगमा या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर बास द लीडेच्या खात्यात 1 विकेट गेली.
दक्षिण आफ्रिकेचा विजय
🇿🇦 win in New York 👏
A gritty 59* from David Miller guides them to their second victory in the #T20WorldCup 2024 🔥#NEDvSA pic.twitter.com/2k4IfUJLsk
— ICC (@ICC) June 8, 2024
नेदरलँड्स प्लेइंग ईलेव्हन: स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकेल लेविट, मॅक्स ओडोड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगन व्हॅन बीक, टिम प्रिंगल, पॉल व्हॅन मीकरेन आणि व्हिव्हियन किंगमा.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि ओटनील बार्टमन.