T20i World Cup 2026 : रोहित 2026 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार, आयसीसीची घोषणा
ICC Men’s T20 World Cup Asia and EAP Qualifier : नेपाळ क्रिकेट टीम रोहितच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली आहे. तसेच ओमाननेही या आगामी स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे.

क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शेजारी नेपाळ क्रिकेट संघाने रोहित पौडेल याच्या नेतृत्वात आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे. नेपाळ टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणारी 19 वी टीम ठरली आहे. तसेच नेपाळ व्यतिरिक्त ओमान क्रिकेट संघानेही क्वालिफाय केलं आहे. नेपाळ आणि ओमान या दोन्ही संघांची टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची दुसरी वेळ ठरणार आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 20 संघ खेळण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. या स्पर्धेसाठी 20 पैकी 17 संघ निश्चित झाले होते. तर उर्वरित 3 जागांसाठी 9 संघांमध्ये चुरस होती. आयसीसी टी 20i वर्ल्ड कप आशिया आणि ईएपी पात्रता (ICC Mens T20 World Cup Asia & EAP Qualifier) फेरीतून ओमान आणि नेपाळने चमकदार कामगिरी करत स्पर्धेचं तिकीट मिळवलं.
नेपाळचा विजयी चौकार
नेपाळने या स्पर्धेतील चारही सामन्यात कमाल केली. नेपाळने कतार, यूएई, जपान आणि कुवेत या 4 संघांना पराभूत केल. नेपाळने कतारवर 5 धावांनी मात केली. यूएईवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. जपानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय साकारला. तसेच कुवेतवर 58 धावांनी मात केली. तसेच नेपाळ या स्पर्धेत आणखी 2 सामने खेळणार आहे. नेपाळ ओमान आणि सामोआ विरुद्ध भिडणार आहे.
नेपाळ टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी पात्र
Nepal are on their way to the ICC Men’s #T20WorldCup 2026 ✈️
More ➡️ https://t.co/6k9k6Roo9t pic.twitter.com/txxuXBQFAk
— ICC (@ICC) October 15, 2025
विंडीजचा धुव्वा
नेपाळ क्रिकेट टीमचा गेल्या काही वर्षात कामगिरीची चढता आलेख राहिला आहे. नेपाळ सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. नेपाळने अवघ्या काही दिवसांपूर्वीच तब्बल 2 वेळा टी 20i वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज टीमचा मालिका पराभव केला होता. नेपाळने विंडीज विरुद्धची 3 सामन्यांची टी 20i मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली होती.
टी 20i वर्ल्ड कप 2026 बाबत थोडक्यात
आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेकडे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्पर्धेचा थरार 6 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान रंगणार आहे.
20 पैकी 19 संघ निश्चित
दरम्यान ओमान आणि नेपाळ यांच्याआधी अनुक्रमे टीम इंडिया (यजमान), श्रीलंका(यजमान), अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण अफ्रीका, अमेरिका, वेस्टइंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड, कॅनडा, इटली, नेदरलंड, नामीबिया आणि झिंबाब्वेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी क्वालिफाय केलं आहे.
