NZ vs NED : न्यूझीलंडची विजयी घोडदौड सुरुच, दुसऱ्या सामन्यात नेदलँडचा 99 धावांनी पराभव

NZ vs NED : न्यूझीलंडने नेदरलँडला दुसऱ्या सामन्यात 99 धावांनी पराभूत केलं.यासह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. तसेच नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे.

NZ vs NED : न्यूझीलंडची विजयी घोडदौड सुरुच, दुसऱ्या सामन्यात नेदलँडचा 99 धावांनी पराभव
| Updated on: Oct 09, 2023 | 9:54 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात न्यूझीलंडने 7 गडी गमवून 322 धावा केल्या आणि नेदरलँडसमोर विजयासाठी 323 धावांचं आव्हान ठेवलं. पण नेदरलँडचा संघ 223 धावा करू शकला. न्यूझीलंडने नेदरलँडचा 99 धावांनी पराभूत केलं. यासह न्यूझीलंडने एकूण 4 गुणांची कमाई करत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. तर नेदरलँडचा स्पर्धेतील प्रवास आणखी खडतर झाला आहे. नेदरलँड या स्पर्धेत सलग दोन सामने जिंकत 4 गुणांसह नेट रनरेटमध्ये मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंडकडून विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल आणि टॉम लॅथम यांनी सर्वोत्तम खेळी केली. विल यंगने 70 धावा, कर्णधार टॉम लॅथम याने 53 आणि रचिन रवींद्र याने 51 धावा केल्या.

नेदरलँडचा डाव

न्यूझीलंडने दिलेल्या 323 धावांचं आव्हान गाठण्यासाठी नेदरलँडचा संघ मैदानात उतरला. पण काही खास करू शकला नाही. सहाव्या षटकात पहिला विकेट पडला आणि तेथून रांग लागली. कोलिन अकरमॅन व्यतिरिक्त एकही खेळाडू काही खास करू शकला नाही. त्याने 5 चौकारांच्या मदतीने 73 चेंडूत 69 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक पाच गडी बाद केले. तर मॅट हेन्रीने 3 , तर रचिन रविंद्रने एक गडी बाद केला.

मिचेल मार्श याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. “हे सर्व श्रेय फलंदाजांचे आहे. त्यांच्या कामगिरीमुळे 320 धावांच्या पुढे जाऊ शकलो. त्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी आम्हाला बळ मिळालं. गोलंदाजी हवी तशी झाली नाही पण त्याचा मोबदला चांगला मिळाला असंच सरतेशेवटी म्हणावं लागेल. त्यांच्या फिरकीपटूनही चांगली गोलंदाजी केली.”, असं मिचेल मार्श म्हणाला.

दोन्ही संघांचे खेळाडू

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्होन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सेंटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेन्ट बोल्ट.

नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओ’डॉउड, कॉलिन एकरमॅन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंगेलब्रेक्ट, रूलोफ वॅन डेर मेरवे, रयान क्लेन, आर्यन दत्त आणि पॉल वॅन मीकेरेन.