WC 2023 : वर्ल्डकपमध्ये दोन सामन्यांची मेजवानी, कोणते प्लेयर्स करतील स्वप्नपूर्ती! जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन आणि इतर बाबी
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मंगळवारी डबल हेडर सामने आहेत. त्यामुळे एकाच दिवशी दोन सामन्यांची मेजवानी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आता विजयासोबत गुणांसाठी चढाओढ सुरु झाली आहे. मंगळवारी इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. इंग्लंड आणि श्रीलंकेसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय मिळवणं गरजेचं आहे. पहीला सामना सकाळी 10.30 वाजता इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. इंग्लंडने न्यूझीलंड विरुद्धचा पहिला सामना गमावला आहे. तर बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे या सामन्यात कसं चित्र आता सांगणं कठीण आहे. हा सामना धर्मशाळेच्या मैदानावर होणार आहे.
धर्मशाळा पिच रिपोर्ट
धर्मशाळेचं पिच फलंदाजीसाठी पुरक मानलं जातं. तसेच वेगवान गोलंदाजांना मदत करणार आहे. त्यामुळे या मैदानात विजयी धावांचा पाठलाग करणं पसंत केलं जाईल. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंना मदत मिळू शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकताच गोलंदाजी करणं पसंत केलं जाईल. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशनं प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं. या सामन्यात जो रूट आणि शाकीब अल हसन हे की प्लेयर्स ठरू शकतात. जोस बटलर कमाल करू शकतो. तर सॅम करन आणि शोरीफुल इस्लाम हे बजेट खेळाडू ठरू शकतात.
बेस्ट इलेव्हन : जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, जो रूट (कर्णधार), नजमुल होसेन शांतो, डेविड मलान, शाकिब अल हसन (उपकर्णधार), सॅम करन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, मार्क वूड, शोरिफुल इस्लाम
इंग्लंड आणि बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक/ बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार , विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.
बांगलादेश : मेहिदी हसन मिराझ, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहीद हृदोय, महमुदुल्ला, महेदी हसन/नसुम अहमद, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तुल्यबळ सामना पाहायला मिळू शकतो. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात विजय, तर श्रीलंकेला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. हा सामना मंगळवारी दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. हे मैदान सुद्धा फलंदाजीला पुरक आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभी राहू शकते. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला पसंती दिली जाईल.
बाबर आझम, इफ्तिखार अहमद, कुसल मेंडीस हे कर्णधारपदासाठी योग्य ठरू शकतात. तर मोहम्मद रिझवान, शादाब खान आणि शाहीन आफ्रिदी टॉप पिक ठरतील. तर महीश थीक्षाणा, हारिस रउफ आणि दुनिथ वेलालागे कमाल बजेट खेळाडू ठरू शकतात.
बेस्ट इलेव्हन : मोहम्मद रिझवान, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, दुनिथ वेल्लालागे, शाहीन आफ्रिदी, हारीस रउफ, मथीशा पथिराना, महीश थीक्षाणा.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), एफके जमान, आययू हक, सउद शकील, इफ्तिखार अहमद, एसएच खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, हरिस रउफ, हसन अली
श्रीलंका : पाथुम निसांका, चरीथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), ड्युनिथ वेललागे, कुसल मेंडिस (विकेटकीपर), के परेरा, एस समरविक्रमा, मथीशा पाथीराना, महीश थीक्षाना, डी मदुशंका
