NZ vs NED : न्यूझीलंडचं नेदरलँडसमोर विजयासाठी 323 धावांचं आव्हान, कोण बाजी मारणार? याकडे लक्ष
World Cup 2023, NZ vs NED : न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सहावा सामना सुरु आहे. न्यूझीलंडने या सामन्यात 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता विजयी आव्हान गाठणं नेदरलँडसमोर मोठं आव्हान आहे.

मुंबई : न्यूझीलंडने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हा एकदा 300 पार धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने 50 षटकात 7 गडी गमवून 322 धावा केल्या आणि विजयसाठी 323 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान नेदरलँडचा संघ कसं गाठणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. नेदरलँडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हा निर्णय काही अंशी चुकीचा ठरवला आणि धावांचा डोंगर रचला. न्यूझीलंडकडून विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल आणि टॉम लॅथम यांनी जबरदस्त खेळी केली.
नेदरलँडकडून आर्यन दत्त याने 2, पॉल व्हॅन मीकरेन याने 2, रोलोफ व्हॅन दर मेरवे याने 2 आणि बास दी लीड याने 1 गडी बाद केला. या सामन्यात नेदरलँडच्या संघ कमी धावांवर बाद करण्यात न्यूझीलंडला यश मिळालं तर टॉपचं स्थान अबाधित राहाणार आहे. न्यूझीलंकडून विल यंगने 70 धावा, कर्णधार टॉम लॅथम याने 53 आणि रचिन रवींद्र याने 51 धावा केल्या.
न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभवाचं पाणी पाजलं होतं. मोठ्या फरकाने पराभूत केल्याने नेट रनरेट चांगला आहे. दोन गुणांसह नेट रनरेट चांगला असल्याने न्यूझीलंडचा संघ टॉपला आहे. या सामन्यातही न्यूझीलंडने नेदरलँडला मोठ्या फरकाने पराभूत केलं तर नेट रनरेटमध्ये मोठा फरक दिसून येईल. त्यामुळे उपांत्य फेरी गाठणं सोपं होणार आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्होन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सेंटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेन्ट बोल्ट.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओ’डॉउड, कॉलिन एकरमॅन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंगेलब्रेक्ट, रूलोफ वॅन डेर मेरवे, रयान क्लेन, आर्यन दत्त आणि पॉल वॅन मीकेरेन.
