AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित-विराटला बाद करणाऱ्या गोलंदाजासोबत मैदानात दुर्घटना, थेट रुग्णालयात नेण्याची वेळ

New Zealand vs West Indies, 2nd Test: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनरसोबत एक दुर्घटना घडली. त्यामुळे त्याला मैदानातून थेट रुग्णालयात नेण्याची वेळ आली.

रोहित-विराटला बाद करणाऱ्या गोलंदाजासोबत मैदानात दुर्घटना, थेट रुग्णालयात नेण्याची वेळ
रोहित-विराटला बाद करणाऱ्या गोलंदाजासोबत मैदानात दुर्घटनाImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Dec 10, 2025 | 5:38 PM
Share

Blair Tickner: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि रेड बॉल क्रिकेटमधील सर्वौत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या ब्लेयर टिकनरसोबत दुर्घटना घडली. ब्लेयर टिकनरने विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला आहे. न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजीची ताकद त्याच्यामुळे वाढली आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला मैदानातून थेट रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ब्लेयर टिकनरने चार विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर फाइन लेगवर क्षेत्ररक्षणाला उभा होता. यावेळी त्याने चौकार अडवण्यासाठी उडी मारली. पण क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याचा डावा खांदा डिसलोकेट झाला. त्यामुळे त्याला वेदना असह्य झाल्या. त्याला उठायलाच झालं नाही.

ब्लेयर टिकनर तसाच पडून असल्याचं पाहून न्यूझीलंडच्या फिजिओंनी मैदानात धाव घेतली. त्यानंतर त्यांना कळलं की त्याचा खांदा डिसलोकेट झाला आहे. त्यानंतर क्रिकेट मैदानात स्ट्रेचर आणलं आणि तेथूनच त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. आता त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खरं ब्लेयर टिकनरने दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पदार्पण केलं होतं. त्याला चार विकेटही मिळाल्या होत्या. पण नशिब पुन्हा एकदा त्याच्यावर रूसलं आहे. त्याची दुखापत पाहता त्याला तीन चार महिने मैदानापासून दूर राहावं लागेल असं दिसत आहे.

ब्लेयर टिकनर सध्या कौटुंबिकदृष्ट्या अडचणीत आहे. मागच्या वर्षी डर्बीशरसाठी काउंटी खेळत असताना त्याच्या पत्नीला ब्लड कँसर झाल्यंच निष्पन्न झालं होतं. त्याची पत्नी तेव्हा गरोदरही होती. आता त्याच्या पत्नीवर कीमोथेरपी सुरु आहे. असं असताना ब्लेयर टिकनर दुखापतग्रस्त झाल्याने कुटुंबावर संकट ओढावलं आहे. आता त्यातून लवकर बरा व्हावा यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ न्यूझीलंडच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 205 धावांवर तंबूत परतला. तर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विना बाद 24 धावा केल्या होत्या. टॉम लॅथम नाबाद 7 आणि डेव्हॉन कॉनवे नाबाद 16 धावांवर खेळत आहे.

अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...