
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या मिचेल मार्श याच्या नेतृत्वात न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया या न्यूझीलंड दौऱ्यात टी 20I मालिका खेळत आहे. उभयसंघातील टी 20I मालिका ही एकूण 3 सामन्यांची आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने या मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने बुधवारी 1 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना हा 3 ऑक्टोबर रोजी बे ओव्हल, माऊंट माउंगानुई येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र हा सामना अवघअया 13 बॉलनंतरच संपला. हा सामना कुणी जिंकला? जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला असल्याने न्यूझीलंडसाठी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसरा सामना हा करो या मरो असा होता. या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. न्यूझीलंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं.
न्यूझीलंडने अप्रतिम सुरुवात केली. जेकब डफी याने सामन्यातील दुसऱ्या आणि त्याच्या कोट्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये कमाल केली. जेकबने दुसऱ्या बॉलवर ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हीस हेड याला डेव्हॉन कॉनव्हे याच्या हाती 5 रन्सवर कॅच आऊट केलं. त्यानंतर फक्त 5 बॉलचा खेळ झाला. ऑस्ट्रेलियाने 2.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 16 रन्स केल्या. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. कॅप्टन मिचेल मार्श 9 आणि मॅथ्यू शॉर्ट 2 धावांवर नाबाद परतले. त्यानंतर पाऊस थांबवण्याची आणि खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र बराच वेळ वाट पाहिल्यानंतर परिस्थितीत हाताबाहेर गेली होती. त्यामुळे अखेर नाईलाजाने सामना कोणत्याही निकालाशिवाय पावसामुळे रद्द करण्यात आला. अशाप्रकारे हा सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने नाही तर पावसाने जिंकला.
..आणि पावसाने सामना जिंकला
Not to be this evening. Australia retain the Chappell-Hadlee Trophy. #NZvAUS pic.twitter.com/PgUGhNEpA6
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 3, 2025
दरम्यान उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा बे ओव्हल, माऊंट माउंगानुई येथे शनिवारी 4 ऑक्टोबरला होणार आहे. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर न्यूझीलंडला सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासह पहिल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.