Shah Rukh Khan : तुझ्या अख्ख्या करिअरपेक्षा त्याचा 1 चित्रपट…. शाहरुखला ‘अंकल’ म्हणणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी, कोण आहे ती ?
शाहरूखचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी चाहते आहे. असंख्य लोक त्याच्यावर, त्याच्या स्टाइलवर भरभरून प्रेम करतात. मात्र कोणी शाहरुखला ओळखतं नाही असं सांगितलं तर ? त्याला कोणी अंकल म्हटलं तर ? तुमची रिॲक्श कशी असेल?

बॉलिवूड आणि रोमान्स म्हटलं की अनेकांच्या तोंडी फक्त एकच नाव येतं… ते म्हणजे किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान. रोमान्स्चा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरूखचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी चाहते आहे. असंख्य लोक त्याच्यावर, त्याच्या स्टाइलवर भरभरून प्रेम करतात. मात्र कोणी शाहरुखला ओळखतं नाही असं सांगितलं तर ? त्याहून पुढे म्हणजे ये अंकल कौन है ? असं कोणी तुमच्यासमोरच शाहरुखला म्हटलं तर ? ईईईईईईईईई…. तुमची प्रतिक्रियाही अशीच काहीशी असेल ना. वयाची 60 वर्ष पार करूनही तरूणींचा , महिलांचा हार्टथ्रॉब असलेल्या शाहरुखला कोणी अकंल म्हणतंय.. याची कल्पना करणंही किती विचित्र वाटतं ना !
पण असं प्रत्यक्षात घडलंय आणि सोशल मीडियावर शाहरुखचा फोटो टाकून, ये अंकल कौन है ? असा सवाल एका अभिनेत्रीनेच हा विचारलाय. त्यामुळे सगळीकडे खळबळ माजली असून सोशल मीडियावर तर कमेंट्सना उधाण आलंय. शाहरुखला अंकल म्हणणारी ती अभिनेत्री आहे तरी कोण, आणि तिने त्याला काका असं का म्हटलं ? चला जाणून घेऊया.
नक्की काय घडलं ?
खरंतर रोमान्सचा बादशाह शाहरुख खान नुकताच जॉय अवॉर्ड्स 2026 साठी रियाधला पोहोचला. त्या पुरस्कार सोहळ्यात शाहरुखने त्याच्या स्टाइलने, चार्मने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या इव्हेंटचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यामध्ये तुर्की अभिनेत्री Hande Erçel ही तिच्या मोबाईलमध्ये शाहरुखला रेकॉर्ड करत असल्याचं कॅप्चर झालं. त्यावरून ती शाहरुखची फॅन गर्ल असल्याचे म्हणत युजर्सनी अनेक कमेंट्स केल्या, मात्र त्यानंतर या अभिनेत्री तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट लिहीत एक धक्कादायक विधान केलं आहे. आपण त्याची चाहती नसल्याचं ती म्हणाली.
टर्किश अभिनेत्रीचे शाहरुखबद्दल विधान
शाहरुख खानसोबत इजिप्शियन ब्युटी अमिना खलील ही स्टेजवर होती हे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसलं. तर Hande Erçel ने हे दृष्य कॅमेऱ्यात कॅप्चर केलं. मात्र ती शाहरुखचा नव्हे तर तिच्या मैत्रिणीला अमीना हिचा फोटो, व्हिडीओ काढत होती. तो व्हिडीओ व्हायरल होताच Hande ही शाहरुखची फॅन असल्याची चर्चा सुरू झाली.
मात्र त्यानंतर Hande हिने थेट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून स्टोरी शेअर केली , त्यात शाहरुख आणि अमीना यांचा ऑनस्टेज फोटो होता. त्यात तिने किंग खान, शाहरुखचं नाव घेतलं आणि लिहीलं -कौन है ये अंकल? ( हे काका कोण आहेत ?) शाहरुखला काका म्हणत तिने हा सवाल विचारला.
एवढंच नव्हे तिने पुढे लिहीलं की – “मी फक्त माझी मैत्रीण अमीनाचे रेकॉर्डिंग करत होते. मी त्याची (शाहरुख) चाहती नाही. कृपया सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवणे थांबवा.” असंही तिने नमूद केलं.

नेटकऱ्यांनी सुनावलं
मात्र थोडयाच वेळात तुर्की अभिनेत्रीची ही पोस्ट इंटरनेटवर धडाधड व्हायरल झाली. त्यानतंर हांडे एर्सेलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून ती पोस्ट डिलीट केली. मात्र ती बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला याला ओळखत नाही, आणि त्याच्याबद्दल असे शब्द वापरते यावर अनेक यूजर्सचा विश्वासच बसत नाहीये. या पोस्टमुळे किंग खानचे चाहते नाराज झाले. अनेकांनी असा दावा केला आहे की हांडे एर्सेलची ही पोस्ट बनावट आहे.एवढ्या मोठ्या, प्रसिद्ध बॉलिवूड स्टारची बदनामी करणे पूर्णपणे चुकीचे आहे असंही मत अनेकांनी नोंदवलं.
तुझ्या अख्ख्या करिअरपेक्ष त्याचा फक्त 1 चित्रपट मोठा आहे, असं एका नेटीझनने तिला सुनावलं. शाहरुख अंकल ? तू त्याच्यापेक्षा वयस्कर दिसतेस असा टोला आणखी एका युजरने तिला लगावला. एकूणच शाहरुख खानला अंकल म्हटलेल अनेक चाहत्यांना रुचलेलं नसून त्यांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
Hande Erçel हिला बऱ्याच काळापासून भारतीय प्रोजेक्टमध्ये रस आहे. वृत्तानुसार, तिला सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटात कास्ट केले जाणार होते. कारण चित्रपटाचा काही भाग तुर्कीमध्ये शूट करण्यात आला होता. पण Hande Erçel ही काही या चित्रपटात दिसली नाही. भारतात आल्यावर तिने एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. तिने आमिर खान आणि हृतिक रोशनसोबत काम करण्याबद्दल इच्छाही व्यक्त केली. जर तिला बॉलिवूड आणि त्यातील कलाकारांचे इतके कौतुक वाटते, तर ती शाहरुख खानला कशी ओळखत नाही? असा सवाल अनेक चाहत्यांच्या मनात आहे.
