सोनी कॅमेरा सेन्सरसह ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये आहे ड्युअल डिस्प्ले, जाणून घ्या यांची किंमत आणि फिचर्स
लावा कंपनीचा हा स्मार्टफोन ड्युअल-स्क्रीन सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये प्राइमरी स्क्रीन व्यतिरिक्त मागील बाजूस एक लहान स्क्रीन देखील देण्यात आली आहे. तर या फोनमध्ये कोणती फिचर्स आणि या हँडसेटवर तुम्हाला किती खर्च करावा लागेल हे आजच्या लेखात जाणून घेऊयात.

लावाने त्यांच्या ग्राहकांसाठी मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. लावा ब्लेझ ड्युओ 3 या स्मार्टफोनमध्ये प्रमुख फिचर्स देण्यात आलेले आहेत. जसे की ड्युअल डिस्प्ले दोन स्क्रीन समाविष्ट करण्यात आले आहेत. एक स्क्रीन फोनच्या मागील बाजूस आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की दोन्ही पॅनल AMOLED आहेत. फ्रंट डिस्प्ले दैनंदिन कामांमध्ये आणि व्हिडिओ पाहण्यास मदत करेल, तर कॅमेरा मॉड्यूलजवळील सेकंडरी डिस्प्ले हा तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन दाखवण्यासाठी आहे.
लावा ब्लेझ ड्युओ 3 चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या लावा स्मार्टफोनमध्ये 6.68-इंचाचा फुल एचडी प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले आहे जो 1000 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो आणि या हँडसेटच्या मागील बाजूस असलेल्या कॅमेरा मॉड्यूलजवळ 1.6-इंचाचा सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे.
कॅमेरा: फोनमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी IMX752 प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. मागील आणि पुढील दोन्ही कॅमेरे 2K रिझोल्यूशनच्या प्रतिमा कॅप्चर करण्यास सक्षम आहेत.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7060 प्रोसेसर देण्यात आला आहे.
रॅम: या फोनमध्ये 6 जीबी रॅम असली तरी, रॅम बूस्टरच्या मदतीने रॅम सहजपणे 12 जीबीपर्यंत वाढवता येते.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे, जी 33 वॅट जलद चार्जिंग गती प्रदान करते.
कनेक्टिव्हिटी: सुरक्षेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. 5G सपोर्टसह लाँच केलेला हा फोन ब्लूटूथ व्हर्जन 5.2 ला सपोर्ट करतो.
लावा ब्लेझ ड्युओ 3 ची भारतातील किंमत
हा लावा फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 17 हजार 434 रुपयांना विकला जात आहे. हा हँडसेट इम्पीरियल गोल्ड आणि मूनलाईट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
लावा ब्लेझ ड्युओ 3 पर्याय
लावाच्या या फोनच्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, या किंमतच्या रेंजमध्ये हा लावा स्मार्टफोन iQOO Z10x 5G, Samsung Galaxy M36 5G, vivo Y31 Pro 5G, OPPO K13 5G आणि realme NARZO 80 Pro 5G सारख्या स्मार्टफोन्सना कडक स्पर्धा देऊ शकतो. ———————————————————————————— ————————————————————————————
————————————————————————————
