AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs BAN : ग्लेन फिलिप्सला अशी गोलंदाजी करणं पडलं महागात, पंचांनी तात्काळ सुनावला निर्णय

NZ vs BAN : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 11वा सामना सुरु आहे. न्यूझीलंडची मागच्या दोन सामन्यात कामगिरी चांगली राहिली आहे. तर बांगलादेश स्पर्धेत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे.

NZ vs BAN : ग्लेन फिलिप्सला अशी गोलंदाजी करणं पडलं महागात, पंचांनी तात्काळ सुनावला निर्णय
चुकीला माफी नाही..! न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने गोलंदाजी करताना केलं असं काही, पंचांनी थेट दिला निर्णयImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 13, 2023 | 4:01 PM
Share

मुंबई : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 11 वा सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त कामगिरी केली आहे. बांगलादेशने पहिल्या सामन्यात विजय, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून धोबीपछाड मिळाला आहे. बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढील सर्व सामने जिंकणं आवश्यक आहे. पण बांगलादेशच्या पहिल्या डावातच न्यूझीलंडने वेसण घातल्याचं दिसत आहे. बांगलादेशचे आघाडीचे 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे संघावर दडपण आलं आहे.

लिटन दास ट्रेंड बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर तान्झिद हसन आणि मेहिदी हसन यांच्यात 40 धावांची भागीदारी झाली. पण ही जोडी फोडण्यात लॉकी फर्ग्युसन याला यश आलं. मेहिदी हसन 30 धावा करून तंबूत परतला. तर नजमुल होसेन शांतो अवघ्या 7 धावा करून बाद झाला. अशी सर्व स्थिती असताना 15 व्या षटकात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. कर्णधार केन विलियमसन याने संघाचं 15 वं षटक ग्लेन फिलिप्स यांच्याकडे सोपावलं. त्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नो बॉल आला.

ग्लेन फिलिप्स चेंडू टाकत असताना त्याचा पाय स्टंपला लागला आणि बेल्स पडल्या. पंच धर्मसेना याने तात्काळ तिसऱ्या पंचांशी संपर्क साधला आणि नो बॉल असल्याचं घोषित केलं. त्यामुळे बांगलादेशला फ्री हीट मिळाला. पण त्या चेंडूवर शाकिब अल हसन काही करू शकला नाही. हा चेंडू निर्धाव गेला.

काय सांगतो नियम?

आयसीसीचा हा नवा नियम आहे. यापूर्वी गोलंदाजाचा पाय स्टंपला लागला तर डेड बॉल दिला जायचा. पण यामुळे फलंदाजाचं लक्ष विचलित व्हायचं, असं समालोचक सांगत होते. त्यामुळे आयसीसीने डेड बॉलऐवजी नो बॉल असेल असा नियम बनवला आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराझ, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहिद हृदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.