
वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडने मायदेशातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत पाहुण्या वेस्ट इंडिजला 3-1 अशा एकतर्फी फरकाने पराभूत केलं. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. विंडीजला वनडे सीरिजमध्ये विजयाचं खातंही उघडता आलं नाही. न्यूझीलंडने विंडीजचा 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर आता न्यूझीलंडचा विंडीजला कसोटी मालिकेतही सुपडा साफ करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिजचा या मालिकेत विजय मिळवून दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे.
उभयसंघात 2 ते 22 डिसेंबर दरम्यान एकूण 3 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
टॉम लॅथम हा न्यूझीलंडचं पहिल्या कसोटीत नेतृत्व करणार आहे. तर अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमसन याचं कसोटी संघात कमबॅक झालं आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 2 ते 6 डिसेंबर दरम्यान ख्राईस्टचर्च इथे खेळवण्यात येणार आहे.
केनचं दुखापतीनंतर न्यूझीलंड संघात कमबॅक झालं आहे. केनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास तो खेळताना दिसणार आहे. केनने अखेरचा कसोटी सामना हा जवळपास 2 वर्षांआधी खेळला होता. केन अखेरचा कसोटी सामना हा डिसेंबर 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता केन खेळण्यासाठी तयार आहे.
केन न्यूझीलंडच्या अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. केनने न्यूझीलंडचं 105 कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. केनने या 105 सामन्यांमध्ये 33 शतकं आणि 37 अर्धशतकं झळकावली आहेत. केनने एकूण 9 हजार 276 धावा केल्या आहेत. तसेच केनचा 251 हा हायस्कोअर आहे.
पहिला सामना, 2 ते 6 डिसेंबर, ख्राईस्टचर्च
दुसरा सामना, 10 ते 14 डिसेंबर, वेलिंग्टन
तिसरा सामना, 18 ते 22 डिसेंबर,माउंट मॉनगनुई
पहिल्या कसोटीसाठी यजमान न्यूझीलंड संघ
Our 14-man squad to kick off a new World Test Championship Cycle against the West Indies! FULL STORY – https://t.co/ccuooUrPoP 📖
The first Tegel Test starts December 2 in Christchurch.#NZvWIN pic.twitter.com/VKNqwxrfUS
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 23, 2025
वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनव्हे, केन विलियमसन, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरेल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, ब्लेयर टिकनर, जेकब डफी आणि जॅक फूक्स.