AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025 : “गावसकरांनी तोंडावर ताबा..”, टीम इंडियाच्या विजयानंतर इंझमाम संतापला, व्हीडिओ व्हायरल

Inzamam Ul Haq On Sunil Gavaskar : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याचा जळफळाट झाला. त्याने टीम इंडियाचे दिग्गज सुनील गावसकर यांच्यावर आरोप केले. जाणून घ्या.

Champions Trophy 2025 : गावसकरांनी तोंडावर ताबा.., टीम इंडियाच्या विजयानंतर इंझमाम संतापला, व्हीडिओ व्हायरल
inzamam ul haq on sunil gavaskar ct 2025Image Credit source: Rana Sajid Hussain/Pacific Press/LightRocket via Getty Images and pti
| Updated on: Mar 10, 2025 | 11:01 PM
Share

न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत करेल, असं अनेक पाकिस्तानच्या आजी माजी खेळाडूंना वाटत होतं. मात्र टीम इंडियाने किवींचा 4 विकेट्सने धुव्वा उडवत पाकिस्तानला तोंडावर पाडलं आणि त्यांना चुकीचं सिद्ध करुन दाखवलं.  तसेच टीम इंडियाने साखळी फेरीत यजमान पाकिस्ताचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने पाकिस्तानवर मिळवलेला हा विजय माजी कर्णधार इंझमाम उल हक याला असह्य झाला. इंझमानने या द्वेषातून टीम इंडियाचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्यावर आरोप केले. पाकिस्तानचा सामना करावा लागू नये म्हणून गावसकर यांनी शारजाहमधून पळून जाण्याचा निर्णय केला होता, असा आरोप इंझमामने केला. इंझमामचा हा व्हीडिओ टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर वेगात व्हायरल झाला आहे.

इंझमान उल हक काय म्हणाला?

भारताने सामना जिंकला, ते चांगले खेळले. मात्र मिस्टर गावसकर यांना आकड्यांवर नजर टाकायला हवी. गावसकर यांनी एकदा पाकिस्तानचा सामना करावा लागू नये, यासाठी शारजाहमधून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. ते आमच्यापेक्षा मोठे आहेत, आमचे वरिष्ठ आहेत. आम्ही त्यांचा फार सन्मान करतो. मात्र कोणत्या देशाबाबत अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. तुम्ही तुमच्या संघांचं वाटेल तितकं कौतुक करा, मात्र दुसऱ्या संघाबाबत अशी प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही”, असं इंझमामने म्हटलं.

“त्यांनी आकडे पाहायला हवेत. त्यानंतर त्यांना समजेल की पाकिस्तान कुठे आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिल्याने मला फार दु:ख झालं. ते एक महान आणि सन्मानित क्रिकेटपटू राहिले आहेत. त्यांनी त्यांच्या तोंडावर ताबा ठेवायला हवा. हे मी स्पष्ट शब्दात सांगतोय”,असं इंझमामने म्हटंल.

इंझमामला टीका झोंबली

गावसकर पाकिस्तानबाबत काय म्हणाले होते?

“मला वाटतं की बी टीम इंडियाही पाकिस्तानला निश्चित आव्हान देऊ शकते. सी टीमबाबत मला खात्री नाही. मात्र पाकिस्तान क्रिकेट टीमची सध्याची कामगिरी पाहता त्यांना बी टीमला पराभूत करणं हे अवघड ठरेल”, असं गावसकर म्हणाले होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.