भारत माझी मातृभूमी…पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या दाव्याने खळबळ, भारतीय नागरिकत्व स्वीकारणार? जबदस्तीच्या धर्मांतरवर सोडले मौन

Indian Citizenship : पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने शेजारील देशात काहूर माजले आहे. जबरदस्तीच्या धर्मांतर ते CAA पर्यंत अनेक विषयाला या क्रिकेटपटूने हात घातला. त्याने X या सोशल मीडियावर त्याचे विचार बिनधास्तपणे मांडले.

भारत माझी मातृभूमी...पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या दाव्याने खळबळ, भारतीय नागरिकत्व स्वीकारणार? जबदस्तीच्या धर्मांतरवर सोडले मौन
पाकिस्तान
| Updated on: Oct 05, 2025 | 11:19 AM

Pakistan former Cricketer Danish Kaneria : माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याच्या एका वक्तव्याने पाकिस्तानमध्ये काहूर उठले आहे. भारताला त्याने उघडपणे पाठिंबा दिला आहे. दानिशने 2000 ते 2010 पर्यंत पाकिस्तानसाठी 61 कसोटी तर 18 वनडे सामने खेळले आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेट संघात केवळ दोन हिंदूंना आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यात दानिश कनेरिया हा एक आहे. पाकिस्तानमधील घडामोडींवर तो काही का बोलत नाही असा सवाल त्याला वारंवार विचारण्यात आला. त्यावर मग त्याने त्याचे विचार बिनधास्तपणे X या सोशल मीडियावर मांडले.

काय म्हणाला दानिश

दानिश कनेरिया हा नेहमी भारतातील घाडमोडींवर कमेंट करतो. सोशल मीडियावर व्यक्त होतो. हे तो केवळ भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी करत असल्याचे म्हटले जात होतो. या आरोपाला दानिशने प्रखर उत्तर दिले. त्याने एक्सवर दीर्घ पोस्ट लिहिली. यावेळी त्याने पीसीबीवर टीका केली. पाकिस्तान आणि येथील लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केल्याचे तो म्हणाला. पण त्यासोबतच पाकिस्तानी अधिकारी आणि पीसीबीकडून भेदभावाचे चटके सहन करावे लागले. माझ्या धर्मांतरणाचाही प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा त्याने केला.

भारत ही माझी मातृभूमी

माजी फिरकीपटून पाकिस्तानला जन्मभूमी तर भारताला मातृभूमी मानतो. कनेरियाने भारत आणि नागरिकत्वाविषयी त्याने त्याची स्पष्ट भूमिका मांडली. पाकिस्तान आपली जन्मभूमी आहे. तर भारतात पूर्वजांची, माझी मातृभूमी आहे. भारत माझ्यासाठी एक मंदिर आहे. भारतीय नागरिकत्वाचा माझा कोणताही प्रयत्न नाही. तशी योजना नाही. जर भविष्यात तशी गरज पडली तर CAA मुळे माझा आणि आमच्या लोकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे, असे त्याने स्पष्ट केले.

भगवान श्रीरामचा आशीर्वाद

आपल्या सुरक्षेविषयी भारतातील काही चाहते चिंता व्यक्त करतात. त्यावर दानिश कनेरियाने मत व्यक्त केले आहे. प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने मी आणि माझे कुटुंब सुरक्षित आणि आनंदीत आहे. माझे भाग्य हे भगवान रामाच्या हातात आहे, असे त्याने नमुद केले आहे.