IPL 2026 अंतिम सामन्याबाबत पाकिस्तानने पसरवलं खोटं, अखेर मोहसिन नकवीचं सत्य आलं समोर

Mohsin Naqvi ICC Meeting: आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीबाबत पाकिस्तानकडून खोटं पसरवलं जात आहे. पण सत्य काही वेगळं असून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे.

IPL 2026 अंतिम सामन्याबाबत पाकिस्तानने पसरवलं खोटं, अखेर मोहसिन नकवीचं सत्य आलं समोर
IPL 2026 अंतिम सामन्याबाबत पाकिस्तानने पसरवलं खोटं, अखेर मोहसिन नकवीचं सत्य आलं समोर
Image Credit source: PTI
| Updated on: May 16, 2026 | 9:56 PM

Mohsin Naqvi ICC Meeting: आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीबाबत पाकिस्तान मीडियात एक आश्चर्यकारक दावा केला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये खळबळ उडाली होती. असं कसं होऊ शकते असं अनेकांनी प्रश्न देखील विचारला. दाव्यानुसार, बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना आयपीएल 2026 स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी बोलवलं आहे. तसेच अहमदाबादमध्ये आयसीसी बोर्डाच्या बैठकीतही भाग घेतील. आयसीसी बोर्डाची बैठक 30-31 मे रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. पण या दाव्यातील सर्व हवा निघून गेली आणि खरं काय ते समोर आलं आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पीसीबीचे चेअरमन मोहसिन नकवी यांना अहमदाबादमध्ये होणाऱ्या आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी कोणतंही निमंत्रण दिलं गेलेलं नाही.

पीटीआयच्या वृत्तानुसार, आयसीसी बोर्ड मीटिंग ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये कोणी येण्याचा प्रश्नच नाही. आयसीसी बोर्डाची बैठक आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने आयोजित केली जात असून, यामध्ये जगभरातील प्रमुख क्रिकेट बोर्डांचे वरिष्ठ प्रशासक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खरं तर ही बैठक मागच्या महिन्यात दोहा येथे होणार होती. पण पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. मोहसिन नक्वी हे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी आभासी पद्धतीने सहभागी होणाऱ्या तीन सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष या बैठकीला येणार हा दावा खोटा ठरला आहे. जे सदस्य प्रवास करू शकत नाहीत त्यांच्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा नेहमीच उपलब्ध असते.

आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. 26 मे पासून प्लेऑफचे सामने सुरू होतील. तीन रोमांचक सामने पार पडल्यानंतर अंतिम फेरीचा सामना 31 मे रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानात आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्याची ही चौथी वेळ आहे. गेल्या वर्षी याच मैदानात अंतिम सामना पार पडला होता. तेव्हा आरसीबीने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं.

Follow Us