AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Narine: गुजरात टायटन्सविरुद्ध सुनील नरीनने आयपीएलचं द्विशतक ठोकलं, पहिला विदेशी खेळाडू ठरला

आयपीएल 2026 स्पर्धेतील 60वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईडर्स यांच्यात होत आहे. हा सामना सुनील नसरीनसाठी खास ठरला. कारण त्याने या सामन्यात आयपीएल सामन्यांचं द्विशतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला.

Sunil Narine: गुजरात टायटन्सविरुद्ध सुनील नरीनने आयपीएलचं द्विशतक ठोकलं, पहिला विदेशी खेळाडू ठरला
Sunil Narine: गुजरात टायटन्सविरुद्ध सुनील नरीनने आयपीएलचं द्विशतक ठोकलं, पहिला विदेशी खेळाडू ठरलाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 16, 2026 | 8:18 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेले असून काही विक्रमांची नोंद इतिहासात होणार आहे. कारण हे विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे. यात एक विक्रमाची भर पडली आहे. हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू सुनील नसरीनच्या नावावर नोंदवला गेला. त्याने गोलंदाजी किंवा फलंदाजी करून हा विक्रम रचला नाही. तर सामने खेळून हा विक्रम रचला आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेतील अनोखा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. अशी कामगिरी करणारा सुनील नरीन हा पहिला विदेशी खेळाडू ठरला. यापूर्वी असा विक्रम करणं कोणत्याही विदेशी खेळाडूला जमलं नाही आणि तेही एकाच संघासाठी… कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात प्लेइंग 11 मध्ये सुनील नरीन नाव निश्चित होताच हा विक्रम रचला गेला आहे. आयपीएल स्पर्धेत 200 सामना खेळणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. त्याच्या या विक्रमाच्या आसपास कोणताही विदेशी खेळाडू नाही.

सुनील नरीनने 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 15 पर्वात सुनील नरीन कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. या दरम्यान कोलकाता नाईट रायडर्ससाठी तीन जेतेपद मिळवून देण्यात त्याचं मोलाचं योगदान राहिलं. सुनील नरीननंतर दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड आहे. त्याने 189 सामने खेळले आहेत. पण आता स्पर्धेतून निवृत्त झाला आहे. त्यामुळे सुनील नरीनचा विक्रम कायम असणार आहे. एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर 184 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमधून आऊट झाले आहेत. त्यामुळे सुनील नरीनचा विक्रम भविष्यात मोडणं कठीण आहे.

सुनील नरीन आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा एकमेव विदेशी गोलंदाज ठरला आहे. त्याने या स्पर्धेत 200हून अधिक विकेट घेतल्या आहे. त्यानंतर ड्वेन ब्रावोचा क्रमांक लागतो. त्याने 183 विकेट घेतल्या आहेत. तर गुजरात टायटन्सकडून खेळणारा राशिद खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 174 विकेट घेतल्या आहेत.

Follow Us
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?